Cricketnama 2023 : उपराजधानीत सोमवारपासून नेतेमंडळी मैदानात भिडणार; 'क्रिकेटनामा'ची उत्कंठा शिगेला

Sarkarnama Political Cricket Competition : 'सरकारनामा’च्या ‘क्रिकेटनामा’ स्पर्धेसाठी संत्रानगरी नागपूर सज्ज....
Cricketnama 2023 : उपराजधानीत सोमवारपासून नेतेमंडळी मैदानात भिडणार;  'क्रिकेटनामा'ची उत्कंठा शिगेला
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीम लढणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीमसोबत. फडणवीसांचा संघ देणार अजित पवारांच्या खेळाडूंशी टक्कर आणि अजितदादांचे क्रिकेटपटू रोखणार शिवसेनेच्या धावसंख्येचा आलेख. अत्यंत चुरशीचे हे सामने रंगणार आहेत अवघ्या काही तासांनी 'सरकारनामा'च्या 'क्रिकेटनामा' या स्पर्धेमध्ये.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या भव्य क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या शुभहस्ते होणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आहेत. भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हे निमंत्रक आहेत.

Cricketnama 2023 : उपराजधानीत सोमवारपासून नेतेमंडळी मैदानात भिडणार;  'क्रिकेटनामा'ची उत्कंठा शिगेला
MP Danish Ali : भाजपशी पंगा घेणाऱ्या खासदार दानिश अली यांची बसपामधून हकालपट्टी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा'च्या वतीने 11 व 12 डिसेंबर रोजी 'क्रिकेटनामा(CricketNama) स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा विदर्भात पहिल्यांदाच होत आहे. स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. नागपूर येथील मेकोसाबाग परिसरातील मेथोडिस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड येथील श्लालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरातील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी येथे या स्पर्धेतील लढती होणार आहेत.

हिवाळी अधिवेशन काळात एकत्र येणाऱ्या मंत्री, आमदारांतील खिलाडूवृत्ती हेरण्याच्या उद्देशाने आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतींकडं लक्ष वेधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत पवार यांच्या राष्ट्रवादीची टीम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खेळाडू विजयासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर निशाणा साधणार आहेत. सगळ्याच टीमचे तगडे खेळाडू ‘सरकारनामा’ची ट्रॉफी पटकविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही टीम आपल्या गृहशहरात जोरदार सराव करीत आहे. स्पर्धेत विजय मिळवत त्यांनी 'सरकारनामा'ची ट्रॉफी जिंकायचीच असा पक्का निर्धार केलाय. टीम बीजेपी आणि इतर संघाचे आव्हान पेलण्यासाठी नव्या राष्ट्रवादीची अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संघ सज्ज झालाय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही आपल्या पक्षाचे अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरविणार आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'सरकारनामा’ची ट्रॉफी पटकावून दाखवण्यासाठी पक्षाच्या आमदारांनी आपल्या मशाली पेटविल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील टीम मैदान मारण्यासाठी संघर्ष करणार आहे. बच्चू कडूंचाही संघ मैदानावर 'प्रहार' करणार आहे.

Cricketnama 2023 : उपराजधानीत सोमवारपासून नेतेमंडळी मैदानात भिडणार;  'क्रिकेटनामा'ची उत्कंठा शिगेला
Sangali NCP News : 'साहेब की दादा' गोंधळ झाला दूर; अजित पवारांना सांगलीतून मिळाली 'पाॅवर'

संत्रानगरीत क्रीडानगरी सज्ज

'सरकारनामा’च्या ‘क्रिकेटनामा’ स्पर्धेसाठी संत्रानगरी नागपूर सज्ज झाली आहे. मेकोसाबाग येथील मेथोडिस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड येथील श्लालोम स्पोर्ट्स ग्राऊंडवरील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी येथे ही स्पर्धा होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Cricketnama 2023 : उपराजधानीत सोमवारपासून नेतेमंडळी मैदानात भिडणार;  'क्रिकेटनामा'ची उत्कंठा शिगेला
OBC Melava : इंदापूरच्या ओबीसी मेळाव्यात भुजबळांची मोठी मागणी; ‘दोन महिन्यांतील कुणबी...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com