Devendra Fadnavis News: 'देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री'; नागपूरमध्ये झळकले बॅनर, चर्चांना उधाण

Nagpur News : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये बॅनर झळकले आहे. नागपूरच्या बुटीबोरी परिसरात 'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार', अशा आशयाचे बॅनर झळकल्याने राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. तर त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले होते. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं.

Devendra Fadnavis
Ajit Pawar Poster News : अजित पवारांच्या सासरवाडीतही झळकले `भावी मुख्यमंत्री` चे पोस्टर..

त्यानंतर आता 'फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार', अशा आशयाचे बॅनर नागपूरमधील बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात काही घडामोडी घडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बॅनर प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Devendra Fadnavis
Rajaram Sugar Factory Election 1st Result: राजाराम कारखान्याचा पहिला निकाल लागला: महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय

फडणवीस म्हणाले, ''नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहे. ज्यांनी कोणी ते लावले आहे त्यांनी ते काढून टाकावेत. काही अतिउत्साही लोकं असतात, ते असं करतात. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि 2024 मध्ये तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढवू'', असं स्पष्टीकरण त्यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना दिलं.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com