Rajaram Sugar Factory Election 1st Result: राजाराम कारखान्याचा पहिला निकाल लागला: महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय

Kolhapur Politics| पहिल्या फेरीपासून सत्ताधारी आघाडी असलेल्या महाडिक गटाने तिसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम ठेवली आहे.
Mahadevrao Mahadik
Mahadevrao Mahadik Sarkarnama

Rajaram Sugar Factory Election 1st Result: छत्रपती राजाराम कारखान्याचा पहिला निकाल हाती आला असून यात संस्था गटातून माजी आमदार  महादेवराव महाडिक  विजयी झाले आहेत. महादेवराव महाडिक यांना 129 पैकी महाडिक यांना 84 मते पडली आहेत. तर विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना 44 मते पडल्याची माहिती समोर आली आहे. (Rajaram Factory Election Results; Mahadevrao Mahadika's resounding victory)

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत नऊ पैकी सहा गटांमध्ये महाडिक गटाने आघाडी घेऊन आपला विजय निश्चित केला. आतापर्यंत एकूण पाच फेऱ्या झाल्या असून महाडिक गटाचे १३ जण आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता महाडिक गटाची विजयाकडे घौडदौड सुरु झाली आहे. (Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result)

Mahadevrao Mahadik
Rajaram Sugar Factory Election Result: सभासदांचा कल कुणाकडे? राजाराम कारखाना निवडणूक निकालात मोठी अपडेट

सत्ताधारी महाडिक गटाचे 21पैकी 8 उमेदवार आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअंती महाडिक गटाचे विलास यशवंत जाधव 2934, डॉ.मारुती किडगावकर 3129 आणि सर्जेराव पाटील (बोणे) 3051 मतांनी आघाडीवर आहेत. तर विरोधी पॅनलचे सतेज पाटील गटाचे बळवंत गायकवाड 2158 मते, विलास पाटील 2068 मते आणि विठ्ठल माने 2361 मते पडली.

छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली होती. पहिल्या फेरीपासूनच महादेवराव महाडिक यांचा पॅनल आघाडीवर होता. सहाव्या फेरी अंती महाडिक गटाने आपली आघाडीन कायम राखत विजय निश्चित केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com