Nagpur Election 2025: मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात कोण बाजी मारणार बावनकुळे की केदार ? धक्कादायक निकालाची शक्यता

Devendra Fadnavis Nagpur politics : नगरपालिका आणि नगरपरिषदेची निवडणूक नेत्यांची चांगलीच अंगावर घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे.
 Devendra Fadnavis Sunil  Kedar chandrashekhar bawankule
Devendra Fadnavis Sunil Kedar chandrashekhar bawankulesarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नगर पालिका आणि नगर परिषदेची निवडणूक नेत्यांची चांगलीच अंगावर घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही नेत्यांना नाराज आणि बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जात असून या लढाईत कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नागपूर जिल्ह्यातील 15 नगरपालिका आणि 12 नगर परिषदेसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचने आव्हान दिले आहे. पंधरा वर्षांपासून बावनकुळे आणि कुंभारे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र नगर पालिकेच्या तिकीट वाटपावरून त्यांच्यात जुंपली आहे.

याच कामठीमध्ये सुनील केदारांनी (Sunil Kedar) शकूर नगानी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या शाजा भाई यांनी हातावर घड्याळ बांधून केदारांना आव्हान दिले आहे. उमरेड नगर पालिकेत शिंदे सेनेने भाजपच्या नाराज झालेल्या इच्छुकांना आपल्याकडे वळवले आहे. त्यामुळे भाजपला आधी आपल्याच कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. हेच चित्र भिवापूर नगर परिषदेत आहे.

उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम आमदार आहे. पारवे बंधूंच्या आपसातील वादामुळे ही विधानसभा भाजपला गमवावी लागली. स्थानिक निवडणुकीत भाजपने माजी आमदार सुधीर पारवे यांना विचारलेसुद्धा नाही. काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने भाजपात मोठी नाराजी आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे सर्वाधिक उमेदवार सुधीर पारवे यांचे समर्थक असल्याचे दिसून येतात.

 Devendra Fadnavis Sunil  Kedar chandrashekhar bawankule
Fadnavis Vs Shinde: देवाभाऊ, एकनाथ शिंदेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच हाॅटेलात मुक्काम; पण ना भेट ना चर्चा

वाडी नगरपालिकेत केदारांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रेम झाडे यांच्या हातात काँग्रेसचा एबी फॉर्म दिला आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला. याच्या तक्रारी स्थानिकांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे केली आहे. सुमारे दोनशे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

याच नगर पालिकेत उद्धव ठाकरे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हर्षल काकडे यांनी अचानकपणे निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या पत्नी मात्र नगरसेवकाची निवडणूक अपक्ष लढत आहे. भाजपचे आमदार समीर मेघे यांना खुले आव्हान देणाऱ्या केदारांनी बुटीबोरी नगरपालिकेत पंजा कोणाला दिला नाही.

 Devendra Fadnavis Sunil  Kedar chandrashekhar bawankule
MuktaiNagar Election : एकनाथ खडसेंचा संशयास्पद 'यु-टर्न'; 'मविआ'चे नेते अजूनही हँग : मुक्ताईनगरात भाजपला मतदानापूर्वीच 'बाय'

राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या हाती काँग्रेसचा एबी फॉर्म सोपवला आहे. हा त्यांच्या रणनीतीचा भाग असला तरी यामुळे काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते नाराज झाले आहेत. केदारांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी निवडणुकीतून आपले अंग काढून घेतले आहे. याचा फटका काँग्रेसच्याच उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com