Devendra Fadnavis : भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरू असतानाच फडणवीस 'RSS' मुख्यालयात

Bjp National President : केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आली आहे. तरी, नव्या अध्यक्षाबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत.
devendra fadnavis rss.jpg
devendra fadnavis rss.jpgsarkarnama
Published on
Updated on

भाजपत राष्ट्रीय स्तरावरील सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी सकाळचे सर्व कार्यक्रम रद्द करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आली आहे. तरी, नव्या अध्यक्षाबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत. अध्यक्षपदाच्या चर्चांमध्ये अन्य काही नावांबरोबरच देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचेही नाव प्रामुख्यानं घेतलं जात आहे.

देवेंद्र फडणवीस आतापर्यंत भाजपच्या ( bjp ) केंद्रीय नेतृत्वाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा फटका बसला. यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मध्यस्तीनंतर फडणवीस यांनी राजीनामा दिला नसल्याचं सांगण्यात येत आहे. यातच फडणवीस यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या चर्चांना वेग आला आहे.

फडणवीस का शर्यतीत आहेत?

  • नव्या अध्यक्षांच्या नावावरून संघ आणि भाजपत मतभेद आहेत. त्यामुळे अजूनही कुणाचीही अध्यक्षपदावर नियुक्ती झाली नाही. पण, देवेंद्र फडणवीस हे भाजप अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार मानले जातात.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत. त्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही फडणवीसांच्या नावावर कोणताही आक्षेप नाही.

  • देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांच्या मते, फडणवीस हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे मिक्स व्हर्जन आहेत. ते पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी आणि अमित शाह यांची कूटनितीला मूर्त स्वरूप आणण्यासाठी भूमिका बजावू शकतात.

  • तसेच, फडणवीस हे अमित शाह यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे फडणवीस केंद्रात गेले, तर राज्यात नवे नेतृत्व उभे राहू शकते.

दरम्यान, अध्यक्षपदाची चर्चा शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी नाकारली आहे. "भाजपचा मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही चर्चा माध्यमांनीच सुरू केली आहे. ती केवळ माध्यमांमध्येच आहे," असं फडणवीस यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com