Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीस कडाडले, 370 वर वेगळी भूमिका घेतल्याची केली आठवण

Artical 370 : पाकव्याप्त काश्मिर देखील भारतात येण्याचा विश्वास
Devendra Fadnvis
Devendra Fadnvissarkarnama
Published on
Updated on

Political News : केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याची प्रक्रिया योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. 370 हटवण्यात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका होती. असे उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. श्रेय घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाने लोकसभेत एक आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतल्याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.

हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जम्मू काश्मिरमधील 370 कलम हटवण्याची मागणी केली होती. ती मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. उद्धव ठाकरे जो दावा करत आहेत. तो चुकीचा आहे. त्यावेळी त्यांच्या पक्षाने लोकसभेत वेगळी भूमिका घेतली आणि राज्यसभेत वेगळी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnvis
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पाहतायेत अजित पवारांच्या उत्तराची वाट!

उद्धव ठाकरे हे पाकव्याप्त काश्मिर भारतात घ्या आणि मग सगळ्या जम्मू कश्मिरमध्ये निवडणुक घ्या, असा सल्ला देत आहेत. त्यावर तिखट शब्दांत फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाकव्याप्त कश्मिर हे भारतात आले पाहिजे, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. आणि मोदी हे असंभव असेल ते संभव करणारे आहेत. त्यामुळे येत्या काळाची वाट पाहा, असे उद्धव ठाकरेंना सुनावले.

न्यायालयाने 370 दिलेल्या निकालाचे फडणवीस यांनी स्वागत केले. 370 हटवण्यापुर्वी जम्मू कश्मीर हे दहशदवादाचे आगार झाले होते. मात्र, 370 कलम हटवल्याने येथील विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत. विकासाबाबत इथल्या लोकांची असलेल्या आशा आकांक्षा मोदी सरकार पूर्ण करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnvis
Kapil Sibal : काही लढाया हरण्यासाठीच लढल्या जातात; सिब्बलांचे कलम 370 वर सूचक ट्वीट

जो न्याय नवाब मलिकांना तो प्रफुल पटेलांना का नाही, असा सवाल भाजपला उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, नवाब मलिक हे जेलमध्ये होते. मलिकांना जो न्याय तोच इतरांना. धारावीत बाबत ठाकरे जे बोलत आहेत. ते त्यांनीच तपासून पाहवे. धारवीतील लोकांना घर मिळू नये, अशीच उद्धव ठाकरेंची भुमिका असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सुनावले.

Edited by Roshan More

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com