Devendra Fadnavis With Mother.
Devendra Fadnavis With Mother.Sarkarnama

Women's Day : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या नावातच करून टाकला बदल

Devendra Fadnavis : नागपुरात जाहीरपणे दिली माहिती. सरकारच्या नवीन महिला धोरणाचे केले तोंडभरून कौतुक

Women's Day : आपल्याला उत्तुंग यश मिळावे म्हणून अनेक अभिनेते, नेते ज्योतिषाचा सल्ला घेतात. ज्योतिषाच्या सांगण्यानुसार ते विविध उपाय करतात, रत्न धारण करतात, पूजा-हवन आदी करतात. बरेचदा आपल्या नावातही बदल करतात किंवा स्पेलिंगमध्ये फेरफार करतात. आपल्या नावात असाच बदल केला आहे भाजपचे ‘हेविवेट’ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. मात्र, हा बदल करताना त्यांनी कोणत्याही ज्योतिष, अंकशास्त्र किंवा स्पेलिंग करेक्शन करणाऱ्याचा सल्ला घेतलेला नाही. हा बदल त्यांनी स्वत:च केला आहे. त्यामुळे 8 मार्च 2024 पासून देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीन नाव धारण केले आहे. फडणवीस यांनी नागपूर येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात याची माहिती दिली.

राजकारणात यश मिळविण्यासाठी आणि मोठ्यात मोठे पद मिळावे, यासाठी अनेक नेते सातत्याने ज्योतिषाचा सल्ला घेतात. सल्ल्यानुसार ते अनेक रत्नही धारण करतात. देशपातळीवरील काही नेत्यांजवळ तर कुंडली, पंचांग आणि त्या-त्या दिवसाचे होराचक्र पाहून अगदी वेशभूषा सांगणारे ज्योतिषही आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस या नेत्यांपेक्षा काहीसे वेगळे आहेत. पॅन्ट, शर्ट, जाकीट आणि बूट हाच त्यांचा ठराविक पेहराव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण सक्रिय असलेले आणि वॉर्ड कार्यकर्ता ते मुख्यमंत्रिपदाला गवसणी घालणाऱ्या फडणवीसांच्या बोटांमध्ये कोणतेही रत्न दिसत नाहीत. गळ्यात धागेदोरे, गंडाही नसतो. हातात कडे, लॉकेटही ते धारण करत नाहीत. त्यामुळे फडणवीस यांचा नशिबावर नव्हे तर कर्मावर विश्वास असल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis With Mother.
Devendra Fadnavis : 'त्यावेळी पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल!' त्यांचं हसं होतंय; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

रत्न वगैरेंच्या भानगडीत न पडणाऱ्या फडणवीस यांच्यासाठी त्यामुळे नावात बदल करण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीस यांना नावात बदलाचा हा मोह आवरला नाही. त्यांनी हा बदल केलाच व त्याची जाहीरपणे माहितीही दिली. त्याचे झाले असे की, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नागपुरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या महिला धोरणाचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमस्थळी फडणवीस म्हणाले की, त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती त्यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना दिली. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या साऱ्यांनीच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत फडणवीस यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतापर्यंत आपण आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख करीत होतो. कोणताही प्रसंग असला तरी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असे आपण सांगायचो. परंतु यात आता आपण बदल करीत आहोत. आता आपण केवळ देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असे सांगणार नाही. यापुढे आपण आईचे नावही यात जोडणार आहे. यापुढे आपले नाव ‘देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस’ असेल असे फडणवीस यांनी नागपूर येथे जाहीर केले. उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताच कार्यक्रमस्थळी त्यांना प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला. वडिलांसोबत आता आईचेही नाव लावणार असल्याचे फडणवीस यांनी सांगताच राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महिला दिनाच्या निमित्ताने तमाम मातृशक्तीला वंदन आहे. मला अतिशय आनंद होत आहे की, महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या वतीने नवीन महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी मी माझे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असे सांगायचो. मात्र, आता माझे नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असेल,’ असे ते म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Devendra Fadnavis With Mother.
Devendra Fadnavis On Ramdas Kadam: 'रामदास कदमांना टोकाचं बोलण्याची सवय'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com