Devendra Fadnavis : 'त्यावेळी पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल!' त्यांचं हसं होतंय; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Supriya Sule Criticizes Home Department : सुप्रिया सुळे सध्या विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहेत. त्यामुळे त्या करत असलेल्या वक्तव्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची केली टीका.
Uddhav Thackeray, Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Nitin Gadkari, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : भाजपने नुकतीच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांनी नेमका तोच मुद्दा उचलून धरत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे, तर यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांनी आपल्या पक्षात येण्याची ऑफरच दिली आहे. तसेच मंत्रिपद देण्याचेही स्पष्ट केले आहे.

यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची खिल्ली उडवत त्यांना टोला लगावला आहे. स्वत:ला मोठं दाखविण्याचा प्रयत्न ते करत असून, त्यात त्यांचं हसं होतंय, असे फडणवीस यांनी म्हटले आहे, तर राज्यात होत असलेल्या गुंडागिरी, खून अशा घटनांवरून गृहविभागावर खापर फोडणाऱ्या सुप्रिया सुळे यांची वक्तव्ये फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे...

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नव्हते तसेच महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले नाही. यावरून विरोधी पक्षांना हा एक मुद्दाच मिळाला.

गडकरींचं नाव नसल्याने विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'ज्यांनी भजप रुजविण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही. नितीनजी सोडून द्या भाजप, या महाविकास आघाडीत आम्ही तुम्हाला निवडून आणतो', अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती.

Uddhav Thackeray, Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Sanjay Raut : लवादाने स्वतःच दहा पक्षांतरे केली; राऊत यांचा विधानसभा अध्यक्षांवर निशाणा

त्यांच हसं होतंय - देवेंद्र फडणवीस

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दिलेल्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, 'ज्या पक्षाचा बॅन्डबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या राष्ट्रीय नेत्याला ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतील व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या, असं म्हटल्यासारखं आहे'.

गडकरी हे आमचे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राचा (Maharashtra) जेव्हा नंबर येईल तेव्हा त्यांचे नाव जाहीर होईल, ते नागपूरमधून लढतात. ज्यावेळेस पहिली यादी झाली, त्यावेळी महाराष्ट्रात आमच्या महायुतीचा निर्णय झाला नसल्याने आम्ही चर्चा केली नाही.

महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर चर्चा होईल, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल. यामुळे स्वत:ला मोठं दाखविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, त्यांचं हसं होतंय, असे फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुप्रिया सुळेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही...

राज्यात सुरू असलेल्या खून, गोळीबार, ड्रग प्रकरण, गुंडगिरी यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृहविभागावर खापर फोडले होते. त्यावरून हे सरकार म्हणजे 'अबकी बार गोळीबार सरकार' अशी टीका राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.

यावरून फडणवीस म्हणाले, मावळचा गोळीबार झाला तेव्हा सरकार काय करत होतं. ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातील 113 गोवारींचा पोलिसांच्या लाठीहल्ल्यात मृत्यू झाला होता, तेव्हाच सरकार काय करत होतं. त्या सध्या विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहेत.

त्यामुळे त्या अशी वक्तव्ये करत आहेत. ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दरम्यान, महायुतीच्या महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'त्याची वाट बघा! लवकरच तुम्हाला कळेल. याबाबत अधिकृतरित्या सांगितले जाईल'.

R

Uddhav Thackeray, Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Mangesh Chavan : मंगेश चव्हाण यांनी गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भर कार्यक्रमातच केली 'ही' घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com