Chandrasekhar Bawankule : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? ; बावनकुळेंच्या विधानाने चर्चांना उधाण!

Devendra Fadnavis Swearing in Ceremony : विशेष म्हणजे शपथविधीचं ठिकाणही सांगितलं, भंडाऱ्यात भाजप नेते आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
Fadanvis and Bawankule
Fadanvis and BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचा निश्चय भाजप कार्यकर्त्यांना करायला लावला आहे. विशेष म्हणजे बावनकुळेंनी तसं भाजप कार्यकर्त्यांकडून एकमुखाने वदवूनही घेतलं आहे. भंडारा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्तेच्या बैठकीत ते बोलत होते.

२०२४ मध्ये नवीन सरकारमध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची कोण शपथ घेणार? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारला, त्यावर सर्वांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) नाव उच्चारलं. तसेच महाराष्ट्रात एकच वाघ आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, दुसरा कोणी वाघ होऊ शकत नाही, असंही बावनकुळेंनी या वेळी बोलून दाखवलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Fadanvis and Bawankule
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसमोरील संकटं आणखी वाढणार! आता भाजप सांगेल तेच...

बावनकुळे नेमकं काय म्हणाले? -

चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) म्हणाले, ''या नवीन सरकारमध्ये पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर....ऐकलं का सर्वांनी. वानखेडे स्टेडियमवर कुणाचा शपथविधी झाला होता? दोन्ही हात वर करून जोरात सांगा तुमच्या मनात काय? या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर ...'' यावर उपस्थितांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं.

त्यामुळे एकीकडे महायुती आगामी निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढणार असल्याचं अनेकदा सांगितलं गेलं असलं, तरीदेखील आता बावनकुळेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

Fadanvis and Bawankule
Ahmednagar Political News : आशुतोष काळेंच्या विकासकामांचा विखेंच्या हस्ते 'श्री गणेशा'...

याशिवाय या अगोदर बावनकुळेंनी मेळाव्यास उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणि त्यात भंडाऱ्याचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी संकल्प करण्यास सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com