Ahmednagar Political News : आशुतोष काळेंच्या विकासकामांचा विखेंच्या हस्ते 'श्री गणेशा'...

पराभवाचा वचपा काढण्यासाठी बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे यांना आगामी काळात शह देण्याची रणनीती
Radhakrushn Vikhe-Patil, Ashutosh Kale
Radhakrushn Vikhe-Patil, Ashutosh KaleSarkarnama
Published on
Updated on

- राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : कोपरगाव मतदारसंघात आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन मंगळवार, दि. ५ रोजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. श्री गणेश साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विखेंच्या होम ग्राउंडवर थोरात-कोल्हे यांनी केलेली आगेकूच आणि विखे-पाटलांची काळेंच्या कार्यक्रमात उपस्थिती हा "चेकमेट" असल्याचे बोलले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत विजयी आमदार आशुतोष काळे Ashutosh Kale यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली. आता मंत्री राधाकृष्ण विखे Radhakrushn Vikhe व आमदार काळे यांच्या प्रयत्नातून चांदेकसारे व सोनेवाडी परिसरात एमआयडीसी उभारण्यासाठी महायुती सरकारने मंजुरी दिली आहे.

Radhakrushn Vikhe-Patil, Ashutosh Kale
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या सभेसाठी चरणगावात पेरणी थांबविली

त्यानंतर आठच दिवसांत विखे-पाटील कोपरगाव दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याला राजकीय दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राहाता तालुक्यातील श्री गणेश साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे विवेक कोल्हे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना सोबत घेत राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल उभा केले होते.

यात थोरात-कोल्हे यांच्या पॅनेलने विजय मिळवत विखे यांना धक्का दिला. यानंतर विखेंकडून तालुक्यात आलेल्या पाहुण्यांकडे आम्हीही जाऊ शकतो, या आशयाचे वक्तव्य केले. आता विखेंच्या राहाता तालुक्यात आलेल्या पाहुण्यांची परतफेड कोपरगाव Kopargaon मधील कार्यक्रमापासून सुरू होते काय यावर राजकीय विश्लेषकांत चर्चा आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार काळे यांनी प्रलंबित असलेली अनेक विकासकामे निवडून आल्यानंतर पूर्ण केली आहेत. एमआयडीसी उभारण्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने मार्गी लावला होता. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे त्यांना नेहमीच पाठबळ मिळाले. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने मंत्री विखे पाटील व आमदार काळे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खिलारी यांनी दिली.

Edited By : Amol Sutar

Radhakrushn Vikhe-Patil, Ashutosh Kale
Raghav Chadha: राघव चड्ढांना दिलासा; राज्यसभेतील निलंबन 115 दिवसांनंतर मागे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com