Balu Dhanorkar : धानोरकर दाम्पत्य म्हणतंय, ऑनलाइन गेम्स वर बंदी घाला...

ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
MP Balu Dhanorkar and MLA Pratibha Dhanorkar
MP Balu Dhanorkar and MLA Pratibha DhanorkarSarkarnama

चंद्रपूर : हल्ली मोबाईल, टॅब किंवा टीव्हीवर ऑनलाइन गेम्स खेळणं, ही अनेकांची सवय झाली आहे. पण ही सवय आता व्यसनामध्ये परावर्तित होऊ लागली आहे. त्यामुळे या गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar)आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

एकेकाळी केवळ टाईमपास असलेले ऑनलाइन गेमिंग आता अनेकांची सवय झाली आहे, नव्हे व्यसन बनले आहे. आता आपल्या देशात ऑनलाइन गेमिंगची 'साथ' आली आहे. २४ तास तहान, भूक, झोप विसरून गेम खेळणारी तरुण पिढी तयार होत आहे. काही ऑनलाइन गेम्समध्ये पैसे कमावण्याची संधी असल्यामुळे जुगाराप्रमाणे त्याचं व्यसन लागत आहे. सध्या राज्यात मोबाईलद्वारे अनेक ऑनलाइन गेम्सचा सुळसुळाट झाला आहे. या गेमद्वारे सर्रासपणे जुगार खेळाला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या जुगाराच्या विळख्यात तरुण पिढी तसेच लहान मुले सुध्दा गुंतलेली आहे.

संपूर्ण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. या संपूर्ण ऑनलाइन गेम्सवर बंदी आणण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेतदेखील प्रश्न उपस्थित केला होता. अलीकडेच काही दिवसांआधी चंद्रपूर येथील देवाडा गावातील युवकाने ऑनलाइन रम्मी या खेळाच्या नादातून पत्नीची जीवन यात्रा संपून स्वतः आत्महत्या केली. असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत व हजारो कुटुंबे उद्धवस्त होत आहेत, असे धानोरकर म्हणाले.

MP Balu Dhanorkar and MLA Pratibha Dhanorkar
Balu Dhanorkar : खासदार बाळू धानोरकर म्हणतात, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या...

तामिळनाडू सरकारने अलीकडेच अध्यादेश काढून ऑनलाईनच्या सर्व खेळांवर बंदी घातली आहे. बेटिंग आणि जुगारासह ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यासाठी हा अध्यादेश काढला. ज्याद्वारे जुगार आणि ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यात येणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. चंद्रू यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. तसा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढून युवा पिढीला वाचवावे, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com