Dharmaraobaba Atram: धर्मरावबाबा आत्रामांना हवे फडणवीसांचे नेतृत्व; पालकमंत्रीपदात स्वारस्य नसल्याचे सांगत वाद टाळला?

NCP and BJP News: शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्र्यांमध्ये अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच
Dharmaraobaba Atram
Dharmaraobaba AtramSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्र्यांमध्ये अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. असे असतानाही शिंदे-फडणवीस-पवारांनी मधला मार्ग काढत 15 ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यांमध्ये करण्यात येणाऱ्या झेंडा वंदनाच्या पार्श्वभूमीवर यादी जाहीर करत वाद टाळण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे, यासाठी अनेक मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाही आता अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मात्र, पालकमंत्रीपदात स्वारस्य नसल्याचे त्यांनी स्वत:च सांगितले.

पालकमंत्र्यांपेक्षा मोठे खाते आपल्याकडे असून झेंडावंदनाचा मानही आपल्याला देण्यात आला, यापेक्षा आणखी काय हवे, असे म्हणत फडणवीस हे आमचे नेते आहेत, असे सांगून एक प्रकारे फडणवीसांचे नेतृत्वच आपल्याला हवे, असे संकेतच धर्मरावबाबा आत्रामांनी दिले. नागपूर विभागातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Dharmaraobaba Atram
Anil Deshmukh On Malik Bail: मलिकांना जामीन मंजूर होताच अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, 'महाराष्ट्रातच नाही तर...'

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्तेत सहभागी झाल्याने एकाच जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचे दावेदार वाढले आहेत. जवळगाव, नाशिक, रायगड जिल्ह्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्‍भवल्याचे चित्र आहे. आपसातील वाद टाळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना नाशिकमधून थेट अमरावती जिल्ह्यात पाठण्यात आले.

Dharmaraobaba Atram
Nawab Malik Bail News: जामीन मिळाला नवाब मलिकांना; पण फटाके फुटले अजितदादांच्या ऑफिसबाहेर

गडचिरोलीतून धर्मरावबाबा आत्राम एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी चर्चा होती. मात्र स्वतः आत्राम यांनीच पालकमंत्री होण्यास आपल्याला स्वारस्य नसल्याचे सांगून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावरून वाद उद्‍भवणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे दिसून येते. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, असे सांगून धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वाद संपुष्टात आणला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com