Dharmarao Baba Atram : एका लेकीने वडिलांना दुसऱ्या क्रमांकावर ढकलले होते; धर्मरावबाबांचे काय होणार?

Dharmarao Baba Atram daughter joins NCP (SP) : अहेरी (जि. गडचिरोली) विधानसभा मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम-हलगीकर यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. याआधीही एका मतदारसंघात बापलेकीत सामना झाला होता आणि लेक विजयी झाली होती. त्यामुळे अहेरी मतदारसंघाबाबतही आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
Dharmarao Baba Atram daughter joins NCP (SP)
Dharmarao Baba Atram daughter joins NCP (SP)Sarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषेत बोलायचे तर 'वस्तादा'ने आपल्याकडे शिल्लक ठेवलेला एक डाव सोडून गेलेल्या आणखी एका सहकार्यावर टाकला आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांचा वस्ताद असा उल्लेख करतात आणि ज्यांच्यासमोर डाव पडला आहे ते आहेत मंत्री धर्मरावबाबा आत्राम. धर्मरावबाबा यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम-हलगीकर याच त्यांच्याशी निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करणार, अशी शक्यता आहे.

तत्कालीन कळंब विधानसभा मतदारसंघात 1995 च्या निवडणुकीत कन्येने वडिलांचा पराभव केला होता. त्यावेळी कळंब मतदारसंघ राखीव होता. आता हा मतदारसंघ धाराशिव-कळंब असा झाला असून, तो खुला आहे. कल्पनाताई नरहिरे यांना शिवसेनेने ऐनवेळी उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून त्यांचे वडील रामलिंग त्रिंबके हे उमेदवार होते. कोणतीही राजयकीय पार्श्वभूमी नसताना कल्पनाताई नरहिरे यांनी पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला होता. पुढच्या निवडणुकीतही त्या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.

भाग्यश्री आत्राम-धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao baba Atram) यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. कल्पनाताई नरहिरे-रामलिंग त्रिंबके यांच्यामध्ये संघर्ष होता, पण तो राजकीय नव्हता, कौटुंबिक होता. कल्पनाताई नरहिरे या त्यावेळी पती रमेश नरहिरे यांच्यासह कळंबमध्ये भाड्याच्या घरात राहायच्या. मतदारसंघ त्याचवेळी राखीव झाला होता. रमेश नरहिरे यांची शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कै. नरसिंग जाधव यांच्यात ऊठ-बस होती. त्यातून जाधव यांनी उमेदवारीसाठी कल्पनाताई यांचे नाव सुचवले होते. बाळासाहेब ठाकरे यांची कळंबमध्ये सभा होती. कल्पनाताई यांना सभेच्या व्यासपीठावर बसवण्यात आले आणि उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, अशी आठवण त्यावेळी शिवसेनेत असलेले अजित पिंगळे यांनी सांगितली. अजित पिंगळे हे सध्या भाजपमध्ये आहेत.

कल्पनाताई आणि त्यांचे वडील रामलिंग त्रिंबके यांच्यात अबोला होता. त्याचे कारण कौटुंबिक होते. काही निर्णयांवरून हा वाद झाला होता, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे, गेल्या तीन ते चार निवडणुकांपासून रामलिंग त्रिंबके हे कळंब मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. मात्र हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आलेला होता. अखेर 1995 मध्ये रामलिंग त्रिंबके काँग्रेसने उमेदवारी दिली आणि समोर शिवसेनेकडून त्यांच्या कन्याच मैदानात उतरल्या होत्या. कल्पनाताई नरहिरे, शेकापचे तत्कालीन आमदार कुंडलिक घोडके आणि रामलिंग त्रिंबके अशी लढत झाली होती. कल्पनाताई नरहिरे विजयी झाल्या आणि त्यांचे वडील रामलिंग त्रिंबके दुसऱ्या क्रमांकवर फेकले गेले होते. आता धर्मराबाबा आत्रामांचे काय होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Dharmarao Baba Atram daughter joins NCP (SP)
Shiv Sena Leader's Prediction : ‘भाजपला विदर्भात केवळ 13-14 जागा मिळतील; फडणवीसांनाही निवडणूक सोपी नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजितदादा पवार यांच्यासह 40 आमदार बाहेर पडले. त्यात धर्मराबाबा आत्राम यांचाही समावेश आहे. आता त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे अहेरी (जि. गडचिरोली) विधानसभा मतदारसंघात बाप-लेकीत झुंज होणार आहे. लेक आणि जावयाला नदीत फेकण्याची भाषा धर्मरावबाबांनी नुकतीच केली आहे. त्यालाही भाग्यश्री आत्राम यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात त्यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले.

भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या पक्षात जाणार, अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच धर्मरावबाबा बिथरले होते. याच महिन्यात तीन तारखेला कागल (जि. कोल्हापूर) येथील भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. कागलचे आमदार, मंत्री हसन मुश्रीफ यांचाही शरद पवार यांची साथ सोडणाऱ्यांमध्ये समावेश आहे. त्यावेळी जयंत पाटील यांनी सोडून गेलेल्यांना चिमटे काढले होते. शरद पवार हे वस्ताद आहेत आणि ते एक डाव शिल्लक ठेवतात, असे ते म्हणाले होते. मुश्रीफ आणि आत्राम यांच्याविरोधात शरद पवार यांनी शिल्लक डाव टाकलेले आहेत. त्यामुळे निवडणूक रंजक होणार आहे.

Dharmarao Baba Atram daughter joins NCP (SP)
Assembly Election 2024 : चंदगडमध्ये विधानसभेसाठी तिरंगी लढत, 18 उमेदवार रिंगणात

कल्पना नरहिरे यांनी वडिलांना आव्हान देऊन वगैरे निवडणूक लढवलेली नव्हती. तरीही निवडणुकीत बाप-लेकीचा सामना झाला. कल्पनाताई नरहिरे यांनी वडील रामलिंग त्रिंबके यांचा पराभव केला. कल्पनाताईना 58 हजार मते मिळाली तर त्यांचे वडील रामलिंग त्रिंबके यांना 32 हजार मते मिळाली. कल्पनाताई या शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या. आपण आमदार होणार, हे त्यांना कधी वाटलेही नसणार. अशा अनेक सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार आणि खासदार केले होते. धर्मरावबाबा आणि त्यांच्या कन्या भाग्यश्री यांच्यातील संघर्षामुळे कल्पनाताई यांच्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीला उजाळा मिळाला आहे. त्यातूनच आत्राम आणि त्यांच्या कन्येत होणाऱ्या निवडणुकीतील संभाव्य संघर्षाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com