Digras APMC : माजी मंत्र्यांनी ‘या’ विद्यमान मंत्र्यांना दिला मोठा धक्का !

Sanjay Rathod : संजय देशमुख आणि विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
Sanjay Rathod and Sanjay Deshmukh
Sanjay Rathod and Sanjay DeshmukhSarkarnama

Yavatmal District APMC Elections Results : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिष्ठेची मानली जाते आणि यावेळी झालेल्या निवडणुकीत ही बाजार समिती माजी मंत्री संजय देशमुख आणि विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. दोन संजयच्या झालेल्या या लढाईत देशमुख राठोडांवर भारी पडले. (Guardian Minister Sanjay Rathore has got a big shock)

दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. १८ पैकी १४ जागांवर माजी मंत्री संजय देशमुख समर्थक विजयी झाले आहे. राठोड यांना केवळ चार जागेवर विजय मिळवता आला.

सत्ताबदलानंतर राठोड शिंदे गटात गेले. त्यानंतर झालेल्या दिग्रस बाजार समिती निवडणुकीत राठोड यांना देशमुखांनी धूळ चारली आहे. मूळ शिवसेनेशी फारकत घेऊन शिंदे गटात गेल्यामुळे त्यांना हा धक्का बसला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेष म्हणजे संजय राठोड यांच्या विधानसभा मतदारसंघात पराभवाचा झटका बसणे म्हणजे त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी हा इशारा मानला जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज लागलेल्या निकालात यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीची बोलबाला दिसत आहे. आज तीन बाजार समित्यांचे निकाल लागले. त्यामध्ये भाजप-शिंदे गटाला केवळ दोन ते चार ठिकाणी यश मिळाले. उर्वरित सर्व जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे.

Sanjay Rathod and Sanjay Deshmukh
Darwha APMC : ‘मविआ’ विरुद्ध शिवसेनेत (शिंदे गट) घमासान, भाजपला दाखवला बाहेरचा रस्ता !

महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ काम करत आहे, असे आजच्या निकालांवरून सध्यातरी दिसते आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना या निवडणुकीत (APMC Election) फारशी प्रभावी कामगिरी करू शकली नाही. या निवडणुकीच्या निकालाचा फटका भाजप-शिंदे गटाला आगामी निवडणुकींमध्ये बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com