ओटीटीवर माझी बदनामी केली, अमेझॉनसह डिस्कवरी प्लसने बिनशर्त माफी मागावी...

अरुण गवळींच्या वकिलांनी म्हटलं आहे की, मागच्या १३ वर्षांपासून अरुण गवळी हे नागपूरच्या (Nagpur) तुरुंगात आहेत. त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा नोंद नाही. तसंच कुणीही तक्रारही दाखल केलेली नाही.
Arun Gawali
Arun GawaliSarkarnama

नागपूर : मनी माफिया या मालिकेत बदनामी प्रकरणी अॅमेझॉन व्हॉईस मीडिया आणि डिस्कव्हरी प्लस या सगळ्यांना अरुण गवळींनी नोटीस पाठवली आहे. या मालिकेत माझा उल्लेख करताना परवानगी घेतली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. डिस्कव्हरी प्लस, (Discovery Plus) अॅमेझॉन (Amezon) आणि व्हॉईस मीडिया या सगळ्यांनी बिनशर्त माफी मागावी आणि अरुण गवळी यांचा उल्लेख काढून टाकावा, अशी मागणीही नोटीसद्वारे करण्यात आली आहे.

मनी माफिया ही मालिका ही वेब सिरीज काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. याच वेब सिरीज प्रकरणात अरुण गवळींकडून (Arun Gawali) नोटीस पाठवण्यात आली आहे. अरुण गवळींच्या वकिलांनी डिस्कव्हरी प्लसला ही नोटीस पाठवली आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून माझी बदनामी करण्यात आल्याचं अरुण गवळींनी म्हटलं आहे. तसा उल्लेखही या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

अरुण गवळींच्या वकिलांनी म्हटलं आहे की, मागच्या १३ वर्षांपासून अरुण गवळी हे नागपूरच्या (Nagpur) तुरुंगात आहेत. त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा नोंद नाही. तसंच कुणीही तक्रारही दाखल केलेली नाही. मात्र वेब सिरीजमध्ये त्यांचं चारित्र्य हनन करण्यात आलं आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बदनामी केली. अशा प्रकारे वेब सिरीजमधून बदनामी करणं गैर आहे. त्यामुळे आम्ही नोटीस पाठवली आहे, असं अरुण गवळींच्या वकिलांनी सांगितलं.

अरुण गवळींच्या मुलाचे १७ नोव्हेंबरला मुंबईत लग्न होते. त्या पार्श्वभूमीवर रजेची मागणी गवळी यांनी केली होती. त्यानुसार गवळी यांना ४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. या रजेत पोलीस सुरक्षेसह गवळी यांनी मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाच्यावतीने घालण्यात आली होती. सध्या अरुण गवळी पुन्हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मनी माफिया ही मालिका काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

Arun Gawali
गॅंगस्टर अरुण गवळी, दगडी चाळ आणि धडकी भरवणारी `भजनाची खोली!`

मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी पॅरोलवर तुरुंगाबाहेर आले होते. त्यानंतर मनी माफियाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वकिलामार्फत अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कव्हरीला कायदेशीर नोटीस पाठवली. अरुण गवळी यांच्यावतीने वकील आशिष पाटणकर आणि प्रतीक राजोपाध्ये यांनी संबंधित नोटीस बजावली आहे. ‘अरुण गवळी यांना पैसे दिल्याशिवाय भायखळ्यात इमारत बांधू शकतो का, त्याचा विचारही करता येणार नाही’, मालिकेतील अशा संवादांवरही या नोटीसद्वारे आक्षेप घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com