MLA Hostel : आमदार निवासाच्या शौचालयात धुतली जातात ताटं, मिटकरींनी फडणवीसांना दिला व्हिडीओ...

Nagpur : आमदार निवासातील शौचालयात ताटं आणि कपबशा धुतल्या जात असल्याचे दिसत आहे.
Winter Session
Winter SessionSarkarnama

Assembly Winter Session : नागपुरात (Nagpur) सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज चौथा दिवस आहे. एखाद अपवाद वगळता रोजच सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत आहेत. पण आज जरा वेगळे घडले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज सभागृहात एक व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये आमदार निवासातील शौचालयात ताटं आणि कपबशा धुतल्या जात असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ आमदार मिटकरींनी (Amol Mitkari) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दिला आहे. यानंतर सभागृहातील वातावरण पुन्हा तापले होते. एक वेटर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या (MLA) कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन वर्ष नागपुरात अधिवेशन झाले नाही. दोन वर्षानंतर नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यानिमित्ताने देखभाल दुरुस्ती, सुविधेसह विविध कामांसाठी कोट्यवधींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. कोट्यवधी खर्च केल्यानंतर देखील आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले, घडलेला प्रकार छोटा असला तरी गंभीर आहे. या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अजित पवार म्हणाले, अधिवेशनासाठी लोकप्रतिनिधी येथे येतात आणि अशा घटना होत असतील, तर ते चांगलं नाही. आमदारांसाठी जे नियम लावले जातात, ते सर्व पाळले जातात. पण ठेकेदार नियम पाळत नाहीत. याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न आमदार मिटकरी यांनी उपस्थित केला. आमदार निवासात रंग रांगोटी केली आहे, पण ती बाहेरून. आतमध्ये वाईट अवस्था आहे. काम करण्याची ही पद्धत आहे, कुणाचे लाड पुरवले जात आहेत, असाही प्रश्‍न आमदार मिटकरींनी उपस्थित केला.

Winter Session
भाजप आणि ५० खोकेवाल्यांचे हिंदुत्वप्रेम बेगडी... अमोल मिटकरी

अधिकाऱ्यांना निलंबित करा, कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका. कुठले पाणी वापरतात, चहा देतात, कसले हात वापरतात, लक्ष कुठे आहे सरकारचे, अशा प्रश्‍नांची सरबत्ती आमदार मिटकरींनी केली. परवा पोलिसांना जेवण नव्हते. आता कुणावर कारवाई करणार आणि कुणाला ब्लॅकलिस्ट करणार, हे सरकारने सांगावे, असे मिटकरींनी विचारले. हा व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावर जो मुद्दा मांडला, मी पण तो व्हिडिओ बघितला. यासाठी जे जबाबदार असतील चौकशी करून कारवाई करू. असे गलिच्छ प्रकार होत असतील आणि आरोग्याच्या काळजी घेतली जात नसेल, तर त्याच्यावर आजच, नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com