District Cooperative Banks News : सहकार खात्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना पुन्हा पत्र; नोकर भरतीचे 'गणित' बिघडणार !

Controversial agency : बॅंकेने एका वादग्रस्त एजंसीची निवड केल्याचे समोर आले.
Chandrapur District Central Co-operative Bank
Chandrapur District Central Co-operative BankSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur District Central Co-operative Bank News : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ३६० पदांच्या नोकरभरतीची मंजुरी मिळून १८ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्याप नोकरभरती होऊ शकली नाही. बॅंकेने एका वादग्रस्त एजंसीची निवड केल्याचे समोर आले. त्यानंतर सहकार विभागाने राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांना नोकरभरतीसाठी दोन एजंसीचे पर्याय सुचविले आहेत. (Two options are suggested for recruitment to all District Banks)

या एजंसींचा आजवरचा पारदर्शक कारभार बघता त्यांच्याकडून नोकरभरती करून घेण्यास बॅंका इच्छुक नाही, असे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे नोकरभरतीचा गुंता आणखी वाढणार आहे. सोबतच नोकर भरतीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसंदर्भात 'बॅंकेच्या नोकरभरतीत संशयास्पद एजन्सीला पसंती' या आशयाचे वृत्त 'सरकारनामा'ने २२ ऑगस्ट २०२३ ला प्रकाशित केले होते.

या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. सहकार खात्यानेसुद्धा याची दखल घेतली. सहकार खात्याने दुसऱ्याच दिवशी २३ ऑगस्टला सहकार आयुक्त व निबंधकांना एक पत्र पाठविले. यात पत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांतील नोकरभरती सामान्य प्रशासन विभागाच्या २१ नोव्हेंबर २०२२ च्या शासन (Government) निर्णयाप्रमाणे टीसीए (TCS) आणि आयबीपीस(IBPS) या एजन्सीमार्फत ऑनलाइन पद्धतीने करावी, असे निर्देश दिले. त्यामुळे आता बॅंक काय निर्णय घेते, याकडे नोकरभरतीसाठी इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील ३६० पदांच्या नोकरभरतीला राज्य शासनाने स्थगिती दिली होती. बॅंकेने राज्य शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या (High Court) नागपूर (Nagpur) खंडपीठात आव्हान दिले. न्यायालयाने ३ मार्च २०२३ रोजी स्थगितीचा आदेश रद्द केला. त्यानंतर लगेच बॅंकेच्यावतीने भरती प्रक्रिया राबविण्यात आली. जेएसआर एक्सामिनेशन सर्व्हीस प्रा. लि. या एजन्सीची नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली.

Chandrapur District Central Co-operative Bank
Chandrapur District Bank Recruitment: नोकरभरतीसाठी निवडली वादग्रस्त एजन्सी, सहकार आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली !

याच एजन्सीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची नोकरभरती प्रक्रिया राबविली. या भरती प्रक्रियेत अनियमितता झाली, अशा तक्रारी झाल्या. त्यानंतर या एजन्सीची चौकशी सुरू झाली आहे. तत्पूर्वी, दुसरीकडे सहा मार्च २०२३ बॅंकेला सहकार विभागाकडून एक पत्र आले. त्यात सहकार आयुक्तांच्या स्तरावर पात्र संस्थांची तालिका तयार होईपर्यंत बॅंक स्तरावर ऑनलाइन भरती प्रक्रियेसाठी संस्था निवडीची कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले.

तत्पूर्वीच जिल्हा बॅंकेने वादग्रस्त एजन्सीची निवड केली होती. सहकार विभागाने पात्र एजन्सीची निवड करताना १० वर्षांच्या अनुभवाची अट टाकली. त्यामुळे वर्कवेल इन्फो टेक्नी. प्रा. लि. पुणे ही एजन्सी न्यायालयात गेली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. विशेष म्हणजे, या एजन्सीनी चंद्रपूर जिल्हा बॅंकेच्या निविदेत भाग घेतला आहे. न्यायालयाचा अंतिम आदेश होईपर्यंत पात्र संस्थांची तालिका अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.

Chandrapur District Central Co-operative Bank
Chandrapur Congress News : कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी हाणून पाडला आमदार धानोरकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न!

राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये रिक्त पद भरणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकाल येईपर्यंत टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने नोकर भरती करावी, असे सुचविले आहे. त्यामुळे नोकर भरतीच्या प्रक्रियेतील गुंतागुंत वाढली आहे.

टीसीएस, आयबीपीएसची भीती..

चंद्रपूर (जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी जेएसआर एक्सामिनेशन सर्व्हीस प्रा. लि. नोएडा या एजन्सीची निवड केली. सहकार खात्याशी वारंवार संपर्क करुनसुद्धा टीसीए आणि आयबीपीएस संस्था दाद देत नाही. त्यामुळे आम्हाला जेसीएआर मार्फतच नोकरभरतीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने पुन्हा या संस्थांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

बॅंकेला या संस्थांचा खर्च परवडत नसेल, तर प्रतिव्यक्ती प्रमाणे दर मागावे, असे सुचविले आहे. आता पुन्हा सहकार खात्याने टीसीएस आणि आयबीपीस या एजन्सीमार्फतच नोकरभरती करावी, असे सुचविले आहे. नोकरभरतीसाठी नामांकित एजन्सी उपलब्ध असताना बॅंक का टाळाटाळ करीत आहे, हे कोडे अनेकांना अद्याप उलगडले नाही.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com