Old Pension Scheme : कर्मचारी संपात फूट? जुनी पेन्शन संघटना संप सुरू ठेवण्यावर ठाम

Government Employee : संप मागे घेऊन कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप
Employee Agitation
Employee AgitationSarkarnama
Published on
Updated on

Old Pension Agitation: महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा आठवड्यापासून जुनी पेन्शन (Old Pension) मिळावी, या मुख्य व इतर मागण्यांसाठी संप सुरू होता. त्यामुळे राज्यातील विविध शासकीय कार्यालयांसह रुग्णालयातही अनेक अडचणी निर्माण झाल्या. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. या मुद्द्यांकडे लक्ष वेधून राज्य सरकारने कार्मचारी संघटनांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत मध्यवर्ती समितीने संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा (Government Employee) संप मागे घेतल्याची घोषणा काही वेळापूर्वी समन्वयक विश्वास काटकर यांनी केली. काटकर यांनी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना उद्यापासून कामावर रुजू व्हा, असे आवाहनही केले आहे. दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती समितीच्या विचाराशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. अचानक संप मागे घेतल्याने काही कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

Employee Agitation
Local Body Election : मोठी बातमी! अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात उद्या सुनावणी होणार?

अमरावती जिल्ह्यात (Amravati) संपामध्ये फुटीची ठिणगी पडली आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या (Old Pension Rights Association) वतीने हा संप सुरुच राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अचानक संप मागे घेणे हा कर्मचाऱ्यांचा विश्वासघात आहे, असा आरोपही त्यांनी मध्यवर्ती समितीच्या निर्णयानंतर केला. तसेच संप सुरुच राहणार असल्याचीही भूमिका त्यांनी घेतली. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या दोन परस्परविरोधी भूमिकांमुळे उद्या किती कर्मचारी कामावर रुजू होणार आणि किती कर्मचारी संप चालू ठेवणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Employee Agitation
Mangaldas Bandal : जिजामाता बॅंकेच्या निवडणुकीत मंगलदास बांदलांनी ठोकला शड्डू; आबाराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, कोल्हापूर (Kolhapur) येथून कर्मचारी संप सुरू झाला होता. तेथील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या अश्वासनानंतर संप मागे घेत उद्यापासून कामावर रुजू होणार असल्याचे सांगितले. या संपातून १७ लाख कर्मचारी एक होऊ शकतो हे महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. सरकारने तीन महिन्यात मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांची काय ताकद आहे, ते दाखवून देऊ, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com