Mangaldas Bandal : जिजामाता बॅंकेच्या निवडणुकीत मंगलदास बांदलांनी ठोकला शड्डू; आबाराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

बॅंकेच्या या निवडणुकीला पवार-बांदल असाही कंगोरा आहे.
Mangaldas Bandal
Mangaldas Bandal Sarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर (जि. पुणे) : पुण्यातील जिजामाता सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal), त्यांच्या पत्नी रेखा बांदल आणि शिरुर बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे उतरल्याने निवडणूक चांगलीच रंजक होत चालली आहे. अर्थात मागील पंचवार्षिकमध्ये आमदार अशोक पवारांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुजाता पवार, नियोजन मंडळाचे माजी सदस्य पंडीत दरेकर हे दोघेही बिनविरोध निवडले होते. त्यामुळे बॅंकेच्या या निवडणुकीला पवार-बांदल असाही कंगोरा आहे. या वेळी मात्र सुजाता पवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. (Mangaldas Bandal along with his wife filed application form in Jijamata Cooperative Bank election)

सुमारे २२ हजार सभासद मतदार असलेल्या पुण्यातील जिजामाता सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक १५ एप्रिल रोजी आहे, तर ता. १६ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक १३ संचालक पदासाठी होत आहे. बॅंकेच्या एकुण १२ शाखांपैकी ३ शाखा शिरुर, शिक्रापूर व मांडवगण-फराटा येथे असून एकुण मतदानापैकी ६५०० मतदान शिरुरमध्ये असल्याने ही निवडणूक शिरुरकरांसाठीही महत्वाची आहे.

Mangaldas Bandal
Khed News : चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना खुली ऑफर

बॅंकेच्या एकुण १३ पैकी ८ जागा या महिला संचालकांच्या सर्वसाधारण गटात असून अनुसुचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, खुला वर्ग व पुण्यापासून २५ किलोमीटर बाहेरील महिलांसाठी अशा प्रत्येकी एक जागा प्रत्येक गटातून आहे. मागील वेळी २५ किलोमीटर कक्षेबाहेरील महिला संचालक म्हणून सुजाता पवार तत्कालीन माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकरांच्या माघारीने बिनविरोध, तर खुल्या वर्गातून पंडीत दरेकर बॅंकेत निवडून गेले होते. यावेळी मात्र निवडणुकीत राजकीय रंग भरला असून बांदल व मांढरे यांच्या इंट्रीने शिरुरचे राजकारण ढवळून काढणारी आहे.

Mangaldas Bandal
Bhaskar Jadhav Vs Rane : नारायण राणेंची ती ऑफर मी ठामपणे नाकारली आणि... : भास्कर जाधवांनी सांगितली ती गोष्ट

आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक असलेले विद्यमान संचालक जाकीरखान पठाण व सणसवाडीचे पंडीत दरेकर यांचे बंधू उत्तम दरेकर यांनी अनुक्रमे ओबीसी व खुल्या गटातून अर्ज भरले आहेत. दरम्यान शिक्रापुरातून बांदलांना रोखण्यासाठी आबाराजे मांढरे यांना ज्या पध्दतीने रसद पुरविली गेली आणि मांढरेंनी पत्नी कुसुम यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत एंट्री केली. त्याच पद्धतीने बांदलांना रोखण्यासाठी मांढरेंना पुन्हा एकदा रसद पुरविली जाते की, अशोक पवारांवर नाराज मांढरे वेगळी चाल खेळतात, याची उत्सुकता लागली आहे.

Mangaldas Bandal
Bhaskar Jadhav News : भास्कर जाधवांची सोडतीन वर्षांनंतर जाहीर कबुली : राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला नको होती...

पवारांचे कट्टर विरोधक पुन्हा मैदानात

आमदार अशोक पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून तालुक्यात ओळखले जाणारे काका ऊर्फ ज्ञानदेव खळदकर यांनी या निवडणुकीत पहिल्यांदाच आपली पत्नी संगीता खळदकर यांना उतरविले आहे. काका खळदकर हे घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीत बाद ठरले होते. त्यांच्या बाद होण्यातील राजकारणही शिरुरमध्ये चांगलेच रंगले होते. याच पार्श्वभूमीवर खळदकर यांची बॅंकेच्या निवडणुकीतील एंट्री रंजक ठरते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com