Yavatmal Crime News : यवतमाळच्या सज्जनगड तळेगाव येथे एका टेकडीवर झोपडी बांधून राहणाऱ्या वृद्ध महिला आणि पुरुषाची हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर यवतमाळ एलसीबी पथकाने अवघ्या चार तासांत दुहेरी हत्याकांडातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या. (Four accused in the double murder case were arrested within four hours)
आशिष लिल्हारे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला होता. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आशिष मागील दोन दिवसांत जुगारांमध्ये बरीच मोठी रक्कम हारला होता. यातूनच त्याने इतर तीन साथीदार शुभम बैठवार, सुरज बैठवार आणि अशोक भगत यांना सोबत घेऊन सज्जनगड तळेगाव येथील मृतक लक्ष्मण शेंडे आणि पुष्पा होले या दोघांची हत्या केली.
सोने व पैसे लुटण्याच्या उद्देशाने झोपेत असलेल्या महाराजासह वृद्ध महिलेचा खून करण्यात आला. ही घटना यवतमाळ तालुक्यातील तळेगाव सज्जनगड येथे काल (ता.२९) सकाळी उघडकीस आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. लक्ष्मण चंपतराव शेंडे (वय ९०) व पुष्पा बापूराव होले (वय ७६, रा. सज्जनगड, तळेगाव) अशी मृतांची नावे आहेत.
खून प्रकरणात पोलिसांनी आशिष ज्ञानेश्वर लिल्हारे (वय २२, रा. खानगाव), सूरज सुभाष बहिठवार (वय २४), शुभम सुभाष बहिठवार (वय २४, सर्व रा. खानगाव), अशोक पांडुरंग भगत (वय ५१, रा. कार्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सज्जनगड येथे महाराजासह सोबत राहणाऱ्या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या दरम्यान ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली.
यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोघांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. मृत्यू नेमका कसा झाला, हा प्रश्न पोलिसांना पडला होता. दरम्यान, परिसरात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते.
पंचनामा करताच यवतमाळ (Yavatmal) पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यावर मृत्यूचे कारण समोर आले. त्यात डोक्यावर मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोघांचाही खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
पीएसआय गोपाल उताने यांच्या तक्रारीवरून खुनाचा (Murder) गुन्हा नोंदविला. घटनास्थळी पोलिस (Police) अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ संजय पुजलवार यांनी यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तपासचक्रे वेगात फिरवून अवघ्या दोन तासांत संशयितांना ताब्यात घेतले होते. सोने व पैसे लुटण्याचे उद्देशाने खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली.
दोघेही राहायचे सोबतच..
सज्जनगड येथे लक्ष्मण शेंडे यांना महाराज म्हणून ओळखले जात होते. पुष्पा ही वृद्ध महिलादेखील सोबतच राहत होती. महाराज जडीबुटी औषधी देत असल्याने नागरिक या ठिकाणी यायचे. लूटमारीच्या उद्देशाने महाराजासह महिलेला संपविण्यात आले. या खून प्रकरणात सूरज व शुभम हे दोघे सख्खे भाऊ अडकले आहेत.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.