Dr. Ambedkar Bhavan News : गडकरी आणि फडणवीसांनी घेतली धर्मपाल मेश्राम यांची ‘दखल’

Nagpur : सांस्कृतिक भवन पडल्यानंतर आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या होत्या.
Devendra Fadanvis and Ad. Dharmapal Meshram
Devendra Fadanvis and Ad. Dharmapal MeshramSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ambazari's Dr. Babasaheb Ambedkar Bhavan News : नागपूर शहरातील अंबाझरी तलावालगतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडल्यानंतर आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या होत्या. त्यानंतर विविध संघटनांनी आंदोलने केली. जनतेच्या भावना पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवन पाडल्यानंतर क्रीडा कंपनीने सुरू केलेल्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. (As per the order of Devendra Fadnavis, that work was suspended)

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्या कामाला स्थगिती देण्यात आली. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील समितीने केलेल्या शिफारशीनुसार एमटीडीसीने स्थितीचा दिलेला हा निर्णय आंबेडकरी समुदायाच्या भावनांचा सन्मान करणारा असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष ॲड.. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली.

डॉ. आंबेडकर भवनाच्या पतनाने दुखावलेल्या समाज भावनांचा आदर करून न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. मेश्राम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पतनाविरुद्ध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा समाज आंदोलन केले होते.

कोणत्याही पूर्वसूचनेविना क्रीडा कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडल्याचे प्रकरण ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुढे आणले होते. १४ ऑक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर नागपूर महानगरपालिकेने बाबासाहेबांचा जाहीर सत्कार केला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर १९७६ साली त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अंबाझरी तलावालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्माण करण्यात आले.

Devendra Fadanvis and Ad. Dharmapal Meshram
BRS Nagpur News : उपराजधानीत बीआरएसचा पहिला दणका राष्ट्रवादीला !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याची बाब उजागर करून पुढे भारतीय जनता पक्षाद्वारे वारंवार समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली होती. ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या 'दखल' या पुस्तकात देखील या घटनेवर विशेष भर देण्यात आला.

या पुस्तकाच्या माध्यमातून नितीन गडकरी (Nitin Gadkari) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सदर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले होते. शेवटी गडकरी व फडणवीसांनी (Devendra Fadanvis) त्याची दखल घेतली आणि आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) भवनाच्या जागेवर सुरू असलेले बांधकाम थांबले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.