ED Case : सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) खटल्यातून आपली पूर्णपणे मुक्तता झाल्याची माहिती चुकीची आहे. यासंदर्भात विनाकारण अफवा पसरविण्यात येत आहेत. या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशना सध्या नागपूर येथे सुरू आहे. सभागृहात जाण्यापूर्वी भुजबळ यांनी ईडीच्या मुद्द्यावर ‘सरकारनामा’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जर असे कुणी म्हणत असेल की भुजबळांची ईडीच्या खटल्यातून पूर्णपणे मुक्तता झालीय, तर ती माहिती पूर्णत: चुकीची आहे.
सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी आपण सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. विदेशात जाण्याची परवानगी देण्याची विनंती करणारा हा अर्ज होता. न्यायालयाने या परवानगीबाबतच्या कोर्टाच्या निर्णयावर हरकत घेतली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध ईडीने अपिल दाखल केले होते. या काळात आपण परदेशात जाऊनही आलोत. अपिलाचे हे प्रकरण केव्हाच मागे पडले आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर आपण परदेशात जाऊन परतही आलोत. त्यामुळे आता त्याला काही अर्थ राहिला नाही. तो भुतकाळ झालाय, असे भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रकरणातून आपण मुक्त झालो आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ईडीच्या खटल्यातूनही मुक्तता मिळविण्यासाठी आपण पात्र आहोत. ही मुक्तता मिळावी यासाठी आपण न्यायालयात लढा देत असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करीत असलेल्या राज्य मार्गासवर्ग आयोगावर दबाव असल्याने सदस्य राजीनामा देत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता सदस्य उघडपणे नमूद करीत राजीनामा देत असल्याने दबाव असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा दबाव कुणाचा आहे, याचा शोध घेतला पाहिजे असं भुजबळ म्हणाले. सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा त्यांच्यावर दबाव आहे, याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नाही. कुणाचा दबाव आहे हे राजीनामा देणारे सदस्यच सांगु शकतील, असं भुजबळ म्हणाले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आपलं काम करीत आहे. मराठा समाज आपलं काम करीत आहे आणि ओबीसी समाज आपली भूमिका मांडत आहे. आमचं काय म्हणणं आहे, ते यापूर्वीच स्पष्टपणे, जाहीरपणे सांगुन झालय. त्यामुळे त्याच त्या मुद्द्यावर पुन्हा पुन्हा बोलण्यात काही अर्थ नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.