Nagpur Government Medical College, Hospital News : जुनी पेन्शन’च्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज संपाचा तिसरा दिवस आहे. आता या संपाचे परिणाम दिसू लागले आहेत. शासकीय कार्यालये ओस पडू लागली आहेत. तर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात २४ तासांत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11 patients have died in the hospital within 24 hours.
संपकाळात रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. मेडिकलमध्ये संपाच्या गेल्या दोन दिवसांत २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. एकूण ९०० नर्सेस संपावर गेल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सोडल्यास इतर सर्व शस्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
एका दिवसात १५० शस्त्रक्रिया पुढं ढकलल्या जाता आहेत. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी परिचारिकांची मदत मेडिकलमध्ये घेतली जात आहे. नागपूरच्या मेडिकल या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल सकाळी आठ वाजतापासून आज सकाळपर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला.
संपाच्या पहिल्या दोन दिवसांत २५ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर मेडिकलमध्ये रोज सरासरी ८ ते १० रुग्णांचा मृत्यू होतो. मात्र, संपाच्या काळात मृत्यूच्या प्रमाणात थोडी वाढ झाली आहे. ही बाब नागपूर मेडिकल शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभीये यांनी मान्य केली.
हे रुग्ण उपचाराअभावी दगावले नाहीत, तर ते गंभीर आजारी होते, असे डॉ. गजभिये यांनी सांगितले. नागपूर (Nagpur) मेडिकलमधील (Medical) ९०० नर्सेस संपावर गेल्या आहेत. त्यामुळे खाजगी महाविद्यालयातील नर्सिंग विद्यार्थी आणि आजपासून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेत घेतले आहे. असेही डॉ. गजभीये यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णालय (Hospital) आणि महाविद्यालयाचे काम प्रभावित झाले, असेही ते म्हणाले.
उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ डॉक्टर्स जास्तीत जास्त वेळ काम करून रुग्णसेवा प्रभावित होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. प्रसूती सुरळीत सुरू आहेत. या विभागावर कुठलाही परिणाम आम्ही होऊ दिलेला नाही. संप जर जास्त काळ चालला, तर कंत्राटी तत्वावर नर्सेस आणि कर्मचारी घ्यावे लागणार आहेत. नर्सिंग कॉलेजच्या (College) विद्यार्थिनी नवीन आहेत, पण ज्येष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली काम करत आहेत. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही, असेही डॉ. गजभीये यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.