Khadse Vs Mahajan News: "...तेव्हा कुठे जातात संकटमोचक गिरीश महाजन?"

Maharashtra Assembly session 2023: जळगावचे महाविद्यालय नगरला पळवले...
Khadse Vs Mahajan
Khadse Vs Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: जळगावचे पशुवैद्यकीय महाविद्यालय नगरला पळवले जाते. तेव्हा या जिल्ह्याचे तीन-तीन मंत्री कुठे जातात. त्यावेळी ते एकदमच अकार्यक्षम ठरल्याचे सिद्ध झाले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी थेट गिरीश महाजनांचे नाव घेऊन केली. यामुळे येणाऱ्या काळात खडसे विरूद्ध महाजन हा संघर्ष अधिक पेटण्याचे संकेत मिळाले आहेत.

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन विधेयक मांडले. यावर एकनाथ खडसे यांनी चर्चेला सुरवात केली. त्यात त्यांनी गिरीश महाजन यांसह जळगावच्या तीनही मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राज्यातील गोवंश आणि दुग्धविकासासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Khadse Vs Mahajan
Pune Loksabha Election : 'कसबा' जिंकलेल्या काँग्रेससमोर आता ठाकरेंचं चॅलेंज; 'पुणे' लोकसभेवर 'डोळा'

खडसे म्हणाले, मी मंत्री असताना सहा वर्षापूर्वी एका झटक्यात निर्णय घेऊन जळगावला पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्यासाठी साठ एकर जागा उपलब्ध करून दिली. मात्र जागेचा वाद निर्माण करून ते रखडविण्यात आले. नंतर ते महाविद्यालय थेट नगरलाच पळविण्यात आले. मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडला एक महाविद्यालय होईल अशी घोषणा केली. जळगावला तीन- तीन मंत्री आहेत.

अनिल पाटील, गुलाबराव पाटील, संकटमोचक गिरीश महाजन. हे तीन कॅबिनेट मंत्री आहेत, प्रभावी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मात्र जळगावचे पशुवैद्यकीय महाविद्यालय पळवले जाते तेव्हा ते अकार्यक्षम ठरतात. हे मंत्री काय करतात, असा प्रश्न खडसे यांनी विचारला

यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जळगावचे पशुवैद्यकीय महाविद्यालय रद्द झालेले नाही. तसेच लवकरच राज्य सरकारच्या वतीने विनाअनुदानित पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Edited By - Chaitanya Machale

Khadse Vs Mahajan
Maharashtra Assembly Winter Session : पोलीस भरतीवर फडणवीसांनी दिली मोठी अपडेट; NCRBच्या आकडेवारीवरून विरोधकांना सुनावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com