Pune Loksabha Election : 'कसबा' जिंकलेल्या काँग्रेससमोर आता ठाकरेंचं चॅलेंज; 'पुणे' लोकसभेवर 'डोळा'

Pune Loksabha election: पुणे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचं मानलं जातं.
Pune Loksabha
Pune LoksabhaSarkarnama
Published on
Updated on

Pune: महाविकास आघाडीतून पुणे लोकसभेची जागा ही शिवसेना लढणार असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे चांगले उमेदवार असून महाविकास आघाडीने ही जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी केली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचं मानलं जातं. मागील दोन लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसनेच आघाडीतून या जागेवर निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता पुणे लोकसभेची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. पुणे लोकसभेची जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देखील करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Loksabha
Nagpur Winter Session : दिवसाढवळ्या पडणारे खून, महिलांवरील अत्याचार, दंगली राज्यासाठी भूषणावह नाहीत...

ही जागा मागायची झाल्यास आपला दावा अधिक 'स्टाँग' व्हावा, यासाठी जोरदार तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुण्यात मेळावा घेऊन याबाबत चाचपणी देखील केली. तसेच पुढील महिन्यात ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे हे देखील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला आली तर निवडणूक कशी लढायची याबाबतची चाचपणी सध्या करण्यात येत आहे.

'हे' आहेत इच्छुक उमेदवार

याबाबत शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि संजय मोरे यांनी 'सरकारनामा'शी संवाद साधताना शिवसेनेकडे गजानन बाबर, शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे आणि वेळ पडल्यास शहरप्रमुख संजय मोरे हे देखील या निवडणूक रिंगणात उतरू शकतील असे सांगितले.

Pune Loksabha
Pune News: पुण्यात खळबळ; भाजपच्या युवा नेत्याची रेल्वेखाली आत्महत्या

आघाडीत होणार बिघाडी ?

जागा वाटपावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर जोरदार खल सुरू असताना आता स्थानिक पातळीवर देखील लोकसभेच्या जागांबाबत दावेप्रती दावे होऊ लागलेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Chaitanya Machale

Pune Loksabha
Thane Hospital Deaths : ठाणे मृत्यू प्रकरणांतील दोषींवर आजच कारवाई होणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com