Ajit Pawar Meeting : बैठका घेण्यातही अजित पवारांची 'दादा'गिरी; जिल्हाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठकांचा धडाका

Bhandara District Planning : जिल्हा वार्षिक योजनांचा अजित पवारांनी घेतला आढावा.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या कामकामाच्या शैलीसाठी ओळखले जातात. यावेळी एकाच दिवशी टप्प्याटप्प्याने त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधून जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेतला आहे. एकाच दिवशी मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांनी पुन्हा एकदा कामकाजाचा उरक दाखवून दिला आहे.

भंडारा (Bhandara) जिल्हा वार्षिक योजना 2024-25 चा आढावा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी काल (८ जानेवारी) ऑनलाईन पद्धतीने घेतला. यासाठी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) नंदुरबारमधून जोडले गेले होते.

तर भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Ajit Pawar
BHANDARA ZP NEWS : भाजप, राष्ट्रवादीच्या सदस्यांना निधी कमी का ? सर्वसाधारण सभेत पुन्हा खडाजंगी

सवयीप्रमाणे अजित पवारांनी सकाळीच ऑनलाईन पद्धतीने आढावा घेण्यास सुरुवात केली. भंडारा जिल्ह्याचा नंबर सकाळी 9.30 ते 10 या वेळेत लागला. यात जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. त्यांच्याकडून अजित पवार यांनी जिल्ह्याची इत्थंभूत माहिती घेतली.

त्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी विविध यंत्रणाकडून विशेषतः आरोग्य, नगरविकास, शिक्षण, कृषी व सार्वजनिक बांधकाम या विभागांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 2024-25 करिता वित्तीय मर्यादा 155 कोटींची आहे. मात्र, 147 कोटींची मागणी अत्यावश्यक असल्याने 2024-25 करिता 302 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित असल्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

जिल्ह्यात उद्योग, कौशल्य विकासावर आधारित उद्योग सेवा, तसेच मत्स्य व्यवसायाच्या विकासाला वाव असल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी यासाठी जिल्ह्याला जास्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी यावेळी केली. डिसेंबरअखेर वितरीत निधीच्या 84 टक्के खर्च झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवारांनी सांगितले. आरोग्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध होत असतो. तसेच जिल्ह्यात सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर निधी मंजुरीबाबत राज्यस्तरीय निर्णय घेण्यात येईल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लेखाशीर्षातून जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू, असे पवार यांनी आश्वस्त केले. यावेळी 2023-24 मध्ये योजनांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा वित्तमंत्र्यांनी घेतला.

(Edited Avinash Chandane)

R...

Ajit Pawar
NCP Crisis : यापुढे शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा काढल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ; अजितदादांना थेट इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com