एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के, नागपुरात जुना शिलेदार फोडला...

एक जुने शिलेदार ओंकार पारवे शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. त्यांना नागपूरचे (Nagpur) सहसंपर्क प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नियुक्त केले आहे.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : बंडखोरी करून मुख्यमंत्रिपदावर आरूढ झालेले एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शिवसेना आपल्या हातात घेण्यासाठी कुठलीही कसर ठेवलेली नाही. उद्धव ठाकरेंचे सैनिक कसे फोडता येतील, यासाठी त्यांनी एक टीम तयार ठेवली आहे आणि ही टीम यशस्वीपणे कार्य करत आहे. पूर्व विदर्भात ठाकरेंची युवा सेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरेंचे जुने शिलेदार फोडण्यातही त्यांना यश आले आहे.

सद्यःस्थितीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shivsena) शहरात आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचे एक जुने शिलेदार ओंकार पारवे शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. त्यांना नागपूरचे (Nagpur) सहसंपर्क प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नियुक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात नागपुरात उद्धव ठाकरेंची सेना राहील की नाही, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. नागपूर विभागाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी ज्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर दिली, ते चतुर्वेदी उद्धव ठाकरेंची सेना राखण्यात अपयशी ठरत असल्याचे खुद्द शिवसैनिक सांगतात. त्यामुळेच जुने सैनिक शिंदे सेनेत दाखल होत आहेत, असेही काहींचे म्हणणे आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत जोपर्यंत नागपुरात नियमित येत होते, तोपर्यंतच दुष्यंत चतुर्वेदी ॲक्टीव होते. त्यानंतर नागपुरात उद्धव ठाकरे यांची सेना थंड पडली. आता संजय राऊत यांनी लक्ष घातले तर ठीक नाही तर ठाकरे सेनेची गळती कायम राहणार, असेही सांगितले जात आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पण त्यामध्ये उद्धव सेना मागेच दिसत आहे. त्यामुळे ठाकरे सेनेतील गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. स्थानिक नेते अॅक्टीव नसल्याचे कारण त्यासाठी सांगितले जात आहे.

शिंदे सेनेच्यावतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टप्प्याटप्याने धक्के दिले जात आहे. युवा सेनेची मोठी फळीच त्यांनी आपल्याकडे वळविली आहे. काँग्रेसचे पाच माजी आमदार आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हिवाळी अधिवेशनात शिंदे सेनेत सहभागी होणार आहेत. तसा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी यापूर्वीच केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे कोण व कुठले पदाधिकारी जय महाराष्ट्र करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर तसेच विदर्भातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना खुल्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिक शिवसैनिक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
पिंपरीत उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; कामगार नेत्याचा शिंदे गटात प्रवेश!

युवा सेनेचे जिल्हा युवा प्रमुख (नागपूर ग्रामीण) म्हणून राज तांडेकर यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख किरण पांडव, नागपूरचे संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, युवा सेनेचे नवनियुक्त पदाधिकारी हर्षल शिंदे, शुभम नवले, प्रवीण शर्मा, सचिन डाखोरे, बंटी धुर्वे, समीर शिंदे, योगेश गोन्नाडे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com