Eknath Shinde Group : शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणतात, कामाचा ठेका मिळत नसल्याने माझी तक्रार !

Vidarbha Political News : ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसोबत बसून ओल्या पार्ट्या करतात.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeGoogle
Published on
Updated on

Buldana District Shivsena Political News : बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील गटबाजी समोर आल्यानंतर आमचे जिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसोबत बसून ओल्या पार्ट्या करत असल्याचा खळबळजनक आरोप जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. (District head sits with the head of the Thackeray group and holds parties)

जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी आरोप फेटाळले आहेत. तक्रार करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना ठेके मिळत नसल्याने त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केल्याचाही दाणेंचा आरोप आहे. शांताराम दाणे यांनी तक्रार करणाऱ्याच्या विरोधात शेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त आरोप केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेत वाढती गटबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यभरात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मात्र याच शिवसेना शिंदे गटातही गटबाजी वाढत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सध्या शिंदे गटात 'आलबेल' नसल्याचं समोर आलं आहे. थेट जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांना बडतर्फ करण्याची मागणीच जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखासह सहा तालुकाप्रमुख यांनी केली होती.

या सर्वांनी मुंबईत जाऊन मंत्री उदय सामंत यांची भेट घेत ही मागणी केली. याबाबत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन तक्रार करणाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहेत. निवेदनावर काही तक्रारकर्त्यांच्या खोट्या सह्या असून ते माझा संपर्कात आहेत, असा दावाही दाणे यांनी केला आहे.

निवेदनात केले गंभीर आरोप

जिल्ह्याच्या सहा तालुक्यांतील तालुकाप्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात सध्या जिल्हाप्रमुख बदलणे गरजेचे आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख असलेले वसंत भोजने व त्यांच्या सहकाऱ्यांची जवळीक ठेवतात व दिवसासुध्दा त्यांच्यासोबत बसून ओल्या पार्ट्या करतात. त्यामुळे आपले पक्षातील सर्वसामान्य शाखाप्रमुख ते सर्व पदाधिकारी त्यांच्या या वागणुकीला कंटाळले आहेत.

ते दारू पिऊन उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करतात आणि मारण्याच्या धमक्या देतात. त्यांच्या तालुक्यात पक्ष संघटन नसून त्यांच्या त्रासामुळे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्या त्रासामुळे काम करताना अडचणी निर्माण होतात, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Buldana Maratha Protest : धक्कादायक ! मराठा आरक्षणासाठी तरुणाचे टोकाचे पाऊल; गॅलरीतून उडीचा प्रयत्न

शांताराम दाणे यांचे प्रत्युत्तर

जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या विरोधात काही पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत. मी आधीच पक्षात शून्य योगदान असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केलेल्या आहेत. याशिवाय मला दोन कोटी रुपयांची विकासकामे देण्यात आलेली आहे. ती कामे विविध भागांमध्ये सुरू झालेली असल्याने काही ठेकेदार असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठेके मिळत नसल्याने ही तक्रार केल्याचा दावा जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

श्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्यावर पक्षातीलच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून गंभीर आरोप केल्यानंतर याची तक्रार मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतर दाणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दाणे हे खासदार प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय समजले जातात. दरम्यान आता पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुखाविरोधात दंड थोपटल्याने खासदार जाधव आणि पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Eknath Pawar Resigns : भाजपला झटका; जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी माजी शहराध्यक्षांचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com