Vidarbha Congress : शिंदेंनी 'टार्गेट' बदललं, ठाकरेंनंतर काँग्रेसचा नंबर..? धंगेकरांनंतर हिंगोली,बुलडाण्याचे माजी आमदार फुटणार..?

Eknath Shinde Shivsena Vs Congress : काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार अशी चर्चा होती. काँग्रेस व राष्ट्रवादीची विचारधारा सारखी असल्याने राष्ट्रवादीच्या पर्यायाची चाचपणी सुरू होती.
Eknath Shinde, ravindra dhangekar
Eknath Shinde, ravindra dhangekarSarkarnama
Published on
Updated on

सिध्दांत उंबरकार

Vidarbha News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदें यांनी उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिल्यानंतर आता काँग्रेसकडे मोर्चा वळवला आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांंनी शिवसेनेत पक्षप्रवेश करुन 24 तास उलटत नाही,तोच हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर ( हे काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. अशातच विदर्भातही काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलडाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली होती. पण यानंतरही पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. कारण जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश करत आहेत.

दरम्यान, काँग्रेसचा आणखी एक बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच खामगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार, काँग्रेसचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या दिलीपकुमार सानंदा यांनी मंगळवारी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती असून यावेळी बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते.

Eknath Shinde, ravindra dhangekar
BJP News : मोठी बातमी: फडणवीस आपला शब्द पाळणार, विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भाजपनं 'ही' तीन नावं केली फायनल..?

दिलीपकुमार सानंदा हे खामगाव मतदार संघात सलग 15 वर्ष आमदार राहले आहेत. सन २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीपुर्वी सानंदा हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दरम्यान 2024 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली व पुन्हा एकदा ते पराभूत झाले.

आता काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा सानंदा यांनी मंगळवारी(ता.11) मुंबई येथे शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना आणखी जोर आला आहे. राज्यात महाविकास आघाडीची झालेली वाताहात व राजकीय गणिते पाहता अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्याचे सत्र अवलंबले आहे. तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील काही बडे नेते इतर पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे.

Eknath Shinde, ravindra dhangekar
Budget Session : आता सर्व मंत्र्यांना अजितदादांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही; या खेळातील मी फार जुना खेळाडू; जयंतरावांची जोरदार बॅटिंग

आधी राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा

काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार अशी चर्चा होती. काँग्रेस व राष्ट्रवादीची विचारधारा सारखी असल्याने राष्ट्रवादीच्या पर्यायाची चाचपणी सुरू होती. मात्र, सानंदा यांनी शिवसेना नेत्याची भेट घेतल्याने नवीन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

खामगावचे धंगेकर (सानंदा) शिवसेनेच्या वाटेवर ?

पुण्याचे काँग्रेसचे नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांसोबत बोलताना धंगेकर यांनी काँग्रेसने आपल्याला भरभरून दिले. मात्र, कार्यकर्त्यांची इच्छा लक्षात घेता व कामे व्हावीत यासाठी आपण शिवसेनेत जात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, सानंदा सुध्दा धंगेकर यांच्याप्रमाणे पाऊल टाकतात का हे पाहावे लागणार आहे. तर खामगावचे धंगेकरही (सानंदा) शिवसेनेच्या वाटेवर अशी चर्चा आता मतदारसंघासह जिल्ह्यात सुरू आहे.

Eknath Shinde, ravindra dhangekar
Tukaram Mundhe : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 'डॅशिंग' अधिकारी तुकाराम मुंढेंची बीडमध्ये 'एन्ट्री'? गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी फडणवीस मोठा निर्णय घेणार?

जब तक जिंदा हूँ, काँग्रेस का परिंदा हूँ....

दरम्यान दिलीपकुमार सानंदा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. यात गैर काहीही नाही, ते माझे जवळचे मित्र आहेत. 20 मिनिटांच्या चर्चेत केवळ मतदारसंघातील कामासंदर्भात बोललो. राजकीय चर्चा कोणतीही झालेली नसून आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुध्दा भेटलो असल्याचे ते म्हणाले. तर आपल्या पक्षप्रवेशाच्या केवळ पोकळ चर्चा असून जब तक जिंदा हूँ काँग्रेस का परिंदा हूँ असे म्हणत आपण काँग्रेस कदापि सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे नाराजी

बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून जिल्ह्यातील मुकुल वासनिक गट नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर काही नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत इतर पक्षात प्रवेश देखील केला असून आणखी काही बडे नेते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com