Ex-Corporators News : एकीकडे ‘शासन आपल्या दारी’ अन् दुसरीकडे माजी नगरसेवक फिरतात दारोदारी, भाजपला फटका बसणार ?

Government at your door : या योजनेचा फायदा होण्याऐवजी नाराजीच अधिक निर्माण होईल.
Ajit Pawar, Devendra Fadanvis and Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadanvis and Eknath ShindeSarkarnama

Nagpur Political News : राज्यात सत्ता असताना महानगरपालिकेचे प्रशासक ऐकत नसतील तर आम्ही दाद कुणाकडे मागायची, असा सवाल भाजपचे पदाधिकारी आज करत आहेत. एकीकडे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबवयाचा आणि दुसरीकडे महापालिकेत प्रशासक कामे रोखून ठेवणार असेल तर या योजनेचा फायदा होण्याऐवजी नाराजीच अधिक निर्माण होईल, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. (Instead of benefiting from this plan, it will create more resentment)

महापालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देतानाही प्रशासक टाळाटाळ करीत असल्याने माजी नगरसेवक चांगलेच वैतागले आहेत. महापालिकेत त्यांना वेगवेगळ्या विभागांची दारे ठोठावावी लागत आहेत. तरीही कामे होत नाहीत. यात भाजपच्याही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. राज्यात सत्ता असतानाही प्रशासक ऐकत नसल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष अधिकच वाढताना दिसत आहे.

सातत्याने पराभवाच्या भीतीने भाजप महापालिकेच्या निवडणूक घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने (Congress) केला जात आहे. नागपूरसह (Nagpur) जवळपास सर्वच मोठ्या महापालिकांचा (Municipal Corporation) कार्यकाळ संपून वर्षभरापेक्षा अधिक कार्यकाळ लोटला आहे. मात्र निवडणूक केव्हा होईल, हे कुणालाच खात्रीने सांगता येत नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने प्रभागांची रचना करावी लागणार आहे. प्रभाग किती सदस्यांचा करायचा, याचाही निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यायचा आहे. आता लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. केंद्रातर्फे ‘वन नेशन - वन इलेक्शन’चा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता महापालिकेची निवडणूक नेमकी केव्हा होईल, याची शाश्वती राहिलेली नाही.

Ajit Pawar, Devendra Fadanvis and Eknath Shinde
Nagpur BJP News : कार्यालये बंद करून आराम करणाऱ्या माजी नगरसेवकांना भाजपने फटकारले, दिला ‘हा’ इशारा !

गुरुवारी माजी नगरसेवक व परिवहन समितीचे माजी सभापती बाल्या बोरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेचे प्रशासन आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांवर तोफ डागली. बोरकर उघडपणे बोलले. मात्र सर्वच नगरसेवकांची हीच भावना आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे. महापालिकेतसुद्धा भाजपच मागील पंधरा वर्षांपासून सत्तेत होती.

न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक लांबली असली तरी मुद्दामच ती लांबणीवर टाकली जात असल्याची शंका आता बळावत चालली आहे. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांचा संयम सुटत चालला आहे. अनेकांनी आता कार्यालयाचे दरवाजे बंद केले आहे. जेव्हा निवडणूक घोषित होईल, तेव्हा बघू अशी मानसिकता अनेकांची झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com