Bhandara : तीन लाखांच्या बिलासाठी वेठीस धरले, मग ग्रामसेवकाने अधिकाऱ्यालाच...

Anti Corruption Bureau : साकोलीच्या विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले...
Action by ACB In Sakoli.
Action by ACB In Sakoli.Sarkarnama
Published on
Updated on

Sakoli News : डांबर खरेदीमधील अंकेक्षण अहवालात असलेल्या त्रुट्यांमुळे होणारी संभाव्य वसुली टाळण्यासाठी ग्रामसेवकाकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारणे साकोली पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. संबंधित ग्रामसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपल्याच साहेबांच्या ‘डिमांड’ची तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा घालत लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहाथ सापळ्यात पकडले. खिलेंद्र देवरलाल टेंभरे (वय 52) असे विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.

ग्रामसेवक सध्या तुमसरमध्ये कार्यरत आहे. किन्ही (मोखे) ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना 2018-19 या काळात ग्रामपंचायतीने रस्ता डांबरीकरणाच्या कामासाठी 3 हजार रुपये प्रतिटिन या दराने 150 टिन डांबर निविदा मागविली होती. त्यातून खरेदी करण्यात आली. कामानंतर 2023 मध्ये किन्ही ग्रामपंचायतीचे अंकेक्षण (Audit) झाले. या ऑडिट रिपोर्टमध्ये ग्रामसेवकाने 1 हजार रुपये प्रतिटिन दराने डांबर खरेदी न करता 3 हजार रुपये प्रतिटिन दराने खरेदी केल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला.

Action by ACB In Sakoli.
Bhandara Gondia Loksabha Constituency : सुनील मेंढे कारसेवक म्हणून पक्षाच्या नजरेत आले अन् थेट खासदार झाले

रस्ता डांबरीकरणाच्या कामामध्ये मंजूर दरापेक्षा 3 लाख रुपये जादा प्रदान केल्याने ही वसुली करण्यात येईल, असे संबंधित ग्रामसेवकाला विस्तार अधिकारी टेंभरे यांनी सांगितले. वसुली होऊ द्यायची नसेल तर तसा अहवाल न पाठविता आक्षेपांचा निपटारा करून अहवाल पाठवावा लागेल. त्यासाठी 10 हजार रुपये लागतील, अशी मागणी टेंभरे यांनी केली.

खरेदीमधील ऑडिट रिपोर्टमध्ये घेण्यात आलेला आक्षेप हटविण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याने 10 हजार रुपयांची मागणी केल्याने संबंधित ग्रामसेवकाने त्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे करण्याचे ठरवले. ग्रामसेवकाने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठला आणि तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे विस्तार अधिकाऱ्याने पंचांसमक्ष 10 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच खिलेंद्र देवरलाल टेंभरे यांना अटक करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याप्रकरणी साकोली पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात भंडारा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे साकोली पंचायत समितीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाला दिली आहे. चौकशीच्या आधारावर आता जिल्हा परिषद प्रशासन पुढील कारवाई करणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Action by ACB In Sakoli.
Bhandara Blast : वरठीच्या सनफ्लॅग कंपनीत स्फोट, तीन कामगार भाजले; नागपुरात उपचार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com