Devendra Fadanvis Statement: शासनाची पाठराखण करताना फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...

Devendra Fadanvis On Thackeray: महाविकास आघाडीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान सरकार लोकांचे हित साधणारे असल्याचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीचे हे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असल्याची अनेक उदाहरणे पुढे करीत दोन्ही नेते युतीचे हे शासन कसे लोककल्याणकारी आहे, हे सांगण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. (Mahavikas Aghadi was indirectly targeted)

नागपुरात आज (ता. ११) एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा याच विषयाकडे लोकांचे लक्ष वेधले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांची विविध विभागांतील कामे एकाच ठिकाणी व्हावी, यासाठी सत्ताधारी सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची स्तुती करताना फडणवीस यांनी युतीचे सरकार लोकांची कामे अडविणारे पूर्वीच सरकार नसल्याचे मोठे विधान करीत महाविकास आघाडीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

यापूर्वीच्या सरकारमध्ये लोकांची कामे कशी अडत होती, हे सांगण्याचा फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावेळी पुरेपूर प्रयत्न केला. विविध शासकीय विभागांमध्ये कामासाठी लोकांना विनाकारण चकरा माराव्या लागायच्या. त्यावेळी त्यांची कामे करताना अडवणूक व्हायची. परंतु याचे तत्कालीन सरकारला काही घेणेदेणे नव्हते असा थेट आरोप न करता फडणवीस यांनी वेगळ्या शब्दांचा वापर केला.

महाराष्ट्रातील (Maharashtra) युतीचे सरकार हे लोकांची कामे करणारे सरकार आहे. आम्ही लोकांची कामे अडविणारे सरकार नाही’, असे नमूद करीत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. फडणवीस यांचे हे वक्तव्य करण्यामागे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला लक्ष्य करणे हा उद्देश्य नव्हता, तर त्यांचे लक्ष्य होते थेट उद्धव ठाकरे.

दुसऱ्याची रेष खोडण्यापेक्षा आपली रेष मोठी केली की आपोआपच विरोधकांना परास्त करता येते, ही बाब ठाऊक असलेल्या फडणवीसांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात विद्यमान युती सरकार लोकांच्या हिताचे निर्णय कसे घेत आहे, याचा पाढा वाचला. महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार किती वेगाने राज्याची प्रगती साधत आहेत, हे नमूद करताना फडणवीस यांनी विकास पाहिजे असल्यास भाजप शिंदे गटाला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही, असा संदेश मतदारांना दिला.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने वज्रमूठ सभा घेत भाजप आणि शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींमुळे ही वज्रमूठ सैल पडली.

Devendra Fadanvis
Amravati Fadanvis News : आम्ही तर आता पाकिस्तानात जाऊनही हनुमान चालिसा म्हणू..!

आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीच विविध सभांच्या माध्यमातून ‘डॅमेज कंट्रोल’ला सुरुवात केली आहे. मात्र ‘शासन आपल्या दारी’च्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यभरात करीत असलेल्या दौऱ्यांमुळे शासनाचे काम पुन्हा एकदा दिसत तर आहेच शिवाय त्यांची राजकीय मोर्चेबांधणीलाही दौऱ्यांमुळे चांगलीच मदत होत आहे.

Edited By : Atul Mehere

Devendra Fadanvis
Fadanvis On 'INDIA' : समन्वयकही ठरला नाही, अन् पाच नेत्यांचा पंतप्रधान पदावर दावा; फडणवीसांनी घेतला 'इंडिया'चा समाचार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com