Nagpur Politics: 112 कोटींच्या घोटाळ्याने बुडाले नागपूर जिल्हा बँकेंचे जहाज? सहकार विभागाचा दाव्याने फडणवीस-केदार वादाला फोडणी

Sunil Kedar responsible for the Nagpur District Bank crisis : नागपूर जिल्हा बँक आर्थिक घोटाळ्याबाबत न्यायालयाने यापूर्वीच सुनील केदार दोषी ठरविले आहे.
Devendra Fadanvis & Sunil Kedar
Devendra Fadanvis & Sunil KedarSarkarnama
Published on
Updated on

Cooperative News: राज्यातील चार जिल्हा बँका आर्थिक अडचणी सापडले आहेत या बँकांच्या बँकिंग परवान्यांबाबत नाबार्ड कडून लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाचा सहकार विभाग सध्या या बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्याचे सहकार सचिव प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोमवारी बैठक झाली. या बैठकीत नागपूर, नाशिक, धाराशिव आणि बीड या चार जिल्हा बँकांबाबत चर्चा अपेक्षित होती. मात्र यातील बीड जिल्हा बँक मार्च अखेर वसुली व अन्य उपाययोजनांमुळे अडचणीतून बाहेर आली आहे.

Devendra Fadanvis & Sunil Kedar
Devendra Fadnavis District Bank: मुख्यमंत्री फडणवीस, कृषिमंत्री कोकाटे यांच्या जिल्हा बँकांना सहकार आयुक्तांनी दिली शेवटची संधी!

या बैठकीत सहकार विभागाकडून जिल्हा बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा बँक ११२ कोटींच्या घोटाळ्यामुळे अडचणीत आली. हा घोटाळा काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कार्यकाळात झाला होता. संदर्भात सहकार विभागाने कायदेशीर कारवाई केली. यामध्ये न्यायालयाने श्री केदार यांना शिक्षा ठोठावली आहे.

Devendra Fadanvis & Sunil Kedar
Karan Gaikar Politics: हजारो कोटींच्या घोटाळ्यात अजित पवार सुटतात, मग कर्जमाफी का होत नाही?

नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा म्हणून नागपूर बँक चर्चेत होती. या संदर्भात राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करून जिल्हा बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे हा प्रयोग चर्चेत आहे.

सहकार विभागाने नागपूर जिल्हा बँकेच्या अडचणींबाबत थेट काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर खापर फोडले आहे. सध्या या बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वीच्या संचालक मंडळावर देखील सहकार विभागाच्या नियमाअंतर्गत कारवाई केली जात आहे.

धाराशिव जिल्हा बँक विविध साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केल्याने संकटात आली आहे. संबंधित साखर कारखाने तोट्यात गेल्यामुळे ही कर्ज बसवली होऊ शकलेली नाही. या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र यातील किती कर्ज वसुली होईल याबाबत प्रशासन साशंक आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा बँकेबाबत सहकार आयुक्त यांनी विविध सूचना केल्या आहेत. सहकार विभाग स्वतः पुढाकार घेऊन काही प्रयोग करणार आहे.

नाशिक जिल्हा बँक गेली आठ वर्षे विविध अडचणींना सामोरे जात आहे. नोटबंदी नंतर या बँकेचे सुमारे २२० कोटी रुपये रिझर्व बँकेने परत केलेले नाही. या बँकेच्या संचालक मंडळावर सहकार कायदा अंतर्गत कलम ८८ अन्वये १८२ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कारवाई सुरू आहे.

नाशिक जिल्हा बँक प्रामुख्याने शेतीसाठी पुरवठा केलेल्या पीक कर्जामुळे अडचणीत आली आहे. हा कर्ज पुरवठा विविध कार्यकारी सहकारी संस्थामार्फत करण्यात आला आहे. त्यांनी वसुली करण्यात कसूर केला आहे. बँकेचे ४८ टक्के थकबाकीदार दहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे आहेत. आगामी काळात सहकार सचिवांनी या वसुलीवर विशेष भर देण्याच्या सूचना केल्या आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com