OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले...

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला. मराठा समाजालाही ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, अशाही मागण्या होऊ लागल्या; पण ओबीसी समाजाने याला तीव्र विरोध केला. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.

नागपूरमध्ये ओबीसी समाजाला मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, 'कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही, हे आरक्षण कमी होऊ देणार नाही. आरक्षणावर अडचण राज्य सरकारच्या वतीने तयार होऊ देणार नाही, असं आश्वासन मी राज्य सरकारच्या वतीने देतो. तसेच, मराठा समाजाची जी मागणी आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना १२- १३ टक्के आरक्षण दिलं होतं. ते पुन्हा मिळावं अशी त्यांची मागणी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

Devendra Fadanvis
New Parliament News : नव्या संसद इमारतीवर फडकला तिरंगा; अनेक विरोधी नेत्यांची हजेरी, मात्र खर्गेंची अनुपस्थिती !

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे समितीची स्थापना केली. जी लोकं आधी कुणबी होती, त्यांना आपण नंतर मराठा म्हणून घोषित केलं, याची पडताळणी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल महिनाभरात येईल. दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहतील अशी परिस्थिती नाही. प्रत्येक समाजाच्या समस्यांवर उपाय काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

फडणवीस म्हणाले की, आम्ही ओबीसी समाजासाठी 26 वेगवेगळे जीआर तयार केले होते. त्यातील अनेक निर्णयांची अंमलबजावणी झाली असून, काहींची अंमलबजावणी सुरू आहे. वसतिगृहांबाबत प्रत्येक जिल्ह्यात बैठका झाल्या. शिष्यवृत्तीसंदर्भातील अडचणीही दूर झाल्या आहेत. आता ओबीसींसाठी 10 लाख घरांची मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर मागण्यांबाबत येत्या आठवडाभरात मुंबईत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर संघटनांची संयुक्त बैठक होणार आहे. ओबीसींसाठी लाभदायक योजना असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Devendra Fadanvis
RSS On Women Reservation : संसद अधिवेशनापूर्वी RSS ने केले 'महिला आरक्षणा'चे सूतोवाच; मोदी सरकार विधेयक आणणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com