Devendra Fadnavis News : 'फडतूस नही, काडतूस हूँ मै, झुकेगा नही घुसेगा' : फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : सावरकरांनी देशासाठी यातना सहन केल्या...
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
Devendra Fadnavis On Uddhav ThackeraySarkarnama

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संतप्त होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता, यावर आता खुद्द फडणवीसांनी प्रत्यु्त्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला ठाकरेंनी फडतूस गृहमंत्री म्हणून बोचरी टीका केली होती. यावर पलटवार करताना फडणवीस म्हणाले की, मी फडतूस गृहमंत्री नाही, काडतूस आहे मी, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस नागपूर येथून सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. यामुळे आता ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील टीका-टिपण्णीला आणखीनच जोर येईल, अशी शक्यता आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

"आयुक्त काय सरकारचं घटक म्हणून काम करत आहेत का अशी शंका येते. फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, नुसती फडणवीसी करणारा एक माणूस, महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून मिरवतोय. यांची गुंडगिरी वाढत चाललेली आहे. ठाण्यातल्या एका पत्रकाराला ही धमकी देण्यात आली, फडतूस गृहमंत्र्याला पदावरती राहण्याचा काहीच अधिकार नाही," असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com