Assembly Winter Session 2023 : लातूरमधील 28 मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा रक्कमेची प्रतीक्षा!

Sambhaji Patil Nilangekar : आमदार संभाजी पाटील निलंगेकरानी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा, म्हणाले...
Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil NilangekarSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे -

Latur News : खरीप हंगाम 2023 मध्ये प्रतिकुल परिस्थितीने संभाव्य नुकसान जोखमीचा अहवाल सादर करून पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील 60 मंडळातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाईच्या 25 टक्के आगाऊ (अग्रीम) रक्कम तत्काळ अदा करण्याचे आदेश देऊन त्याबाबत अधिसुचना काढली होती.

मात्र पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील केवळ 32 मंडळासाठी अग्रीम पीक विमा रक्कम जमा केली आहे. तर उर्वरीत 28 मंडळं अद्यापही या अग्रीम रक्कमेच्या प्रतीक्षेतच आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sambhaji Patil Nilangekar
Devendra Fadnavis : संसदेतील घटनेचं लातूर कनेक्शन,गृहमंत्री फडणवीस 'अॅक्शन मोड'वर ; पोलिस महासंचालकांना दिले 'हे' आदेश

या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशात बुधवारी आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar)यांनी मुद्दा उपस्थित केला. तसेच, 28 मंडळासाठी असलेली 205 कोटी रूपयांची अग्रीम पीक विमा रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी, अशी सभागृहात केली. याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावर्षी अल्प पाऊस व प्रतिकुल हवामानाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हातातून खरीपाचा हंगाम गेलेला आहे. या हंगामासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीक विमा भरला असल्यामुळे संभाव्य नुकसान जोखमीचा अहवाल सादर करण्यात आलेला होता.

Sambhaji Patil Nilangekar
Sugar factory : शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखान्याकडून लातूर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक उचल!

या अहवालानुसार महसुल व कृषी विभागाच्या शिफारशीने जिल्हाधिकार्‍यांनी पीक विमा कंपनीसाठी जिल्ह्यातील 60 मंडळात असलेल्या शेतकर्‍यांना संभाव्य नुकसान भरपाई पोटी 25 टक्के आगाऊ (अग्रीम) रक्कम जमा करण्याची अधिसुचना काढून तसे निर्देश दिलेले होते.

मात्र पीक विमा कंपनीकडून जिल्ह्यातील 32 मंडळांसाठीच 194 कोटी रूपयाची अग्रीम पीक विमा रक्कम जमा केलेली आहे. उर्वरीत 28 मंडळांसाठी असलेली 205 कोटी रूपयांची रक्कम अजूनही विमा कंपनीने जमा केलेली नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com