Devendra Fadnavis : संसदेतील घटनेचं लातूर कनेक्शन,गृहमंत्री फडणवीस 'अॅक्शन मोड'वर ; पोलिस महासंचालकांना दिले 'हे' आदेश

Parliament Security Breach Nagpur Vidhan Bhavan Security Increased : संसदेतील घटनेनंतर नागपुरात विधानभवनात कडक सुरक्षा व्यवस्था...
Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly SessionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2023 : संसदेत आज घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उडी घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेनंतर महाराष्ट्रातही खबरदारी घेतली जात आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना फोन करून महत्त्वाच्या सूचना दिल्या.

Maharashtra Assembly Session
Nagpur Winter Session : लोकसभेतील घटनेनंतर विधान भवनाची सुरक्षा वाढविली

संसदेतली घटनेत सामील असलेल्या दोन तरुणांपैकी एक तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील चाकूरचा आहे. या तरुणाबाबत लवकरात लवकर माहिती घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. तसेच नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवांनीही सुरक्षेचा आढावा घेत सुरक्षा कडक करण्याचे आदेश दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपुरातील अधिवेशनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापतींनीही विधिमंडळ परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला. अधिवेशनातही संसदेतील घटनेचे पडसाद उमटले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला. संसदेतील घटनेत महाराष्ट्रातील तरुणाचा समावेश आहे. हे आंदोलन मराठा आरक्षणासंदर्भात आहे का? याची माहिती घेतली पाहिजे. महाराष्ट्रातही असा प्रकार घडू शकतो. यामुळे विधानभवनाच्या सुरक्षेबाबतही आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ( Parliament Security Breach)

अमोल शिंदेने असे का केले?

संसदेतील घटनेत महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात्याल थोरली झरी गावचा अमोल शिंदे हा तरुणही आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अमोल हा मुख्य आरोपी आहे. त्याचे 12वी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचे आई-वडील हे शेतमजूर आहेत. तर भाऊ पनवेलला रिक्षा चालवतो. त्याने असे का केले? हे अद्याप समजू शकलेले नाही.

Maharashtra Assembly Session
Prithviraj Chavan : मराठा समाजाला दिल्लीचे आरक्षण द्यायचे की राज्याचे ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com