Yavatmal : सरकार विरोधात भूमिपुत्रांचा एल्गार; दिग्रस तालुक्यात केला रास्तारोको

Farmer's Issue : शेतमालाला भाव नसल्याने व्यक्त केला संताप
Farmer's Protest in Yavatmal.
Farmer's Protest in Yavatmal.Sarkarnama
Published on
Updated on

Digras : शेतमालाला भाव नसल्याने तसेच पिकविमा कंपनी अग्रीम रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांविरोधात आंदोलन केले. व्यथीत झालेल्या शेतकऱ्यांनी दिग्रस तालुक्यातील दिग्रस-दारव्हा महामार्गावरील गांधीनगर फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले.

मोख, गांधीनगर, आनंदवाडी, रामगाव परिसरातील संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. 23) रस्त्यावर उतरत तब्बल तीन तास दिग्रस-दारव्हा महामार्ग रोखून धरला. वाहतूक खोळंबल्याने दिग्रस, पुसद, नांदेड, उमरखेड, दारव्हा,नागपूर, अमरावती या बाजूने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

Farmer's Protest in Yavatmal.
Yavatmal : घाटंजी बाजार समितीत लिलाव बंद पाडण्याचा राजकीय डाव उधळला

दिग्रस तालुका हा मुळात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा मतदारसंघ आहे. त्याच मतदार संघातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मतदार संघातीलच शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, तर पालकमंत्री जिल्ह्याच्या इतर मतदार संघातील शेतकऱ्यांना काय न्याय देतील, असा प्रश्न शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला .

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, पिकविम्याची रक्कम बँक खात्यात तत्काळ जमा व्हायला पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात कोणत्याही लोककप्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली नाही. त्यामुळे कापूस-सोयाबीनच्या भावावर ठोस निर्णय झाला नाही. पीक विमा कंपनीने थातूरमातूर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली. काही शेतकऱ्यांना तर अडीच रुपयांपासून 50 ते 100 रुपंयाची नुकसान भरपाई दिल्याने शेतकरी प्रचंड संतापले आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनदरम्यान जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी गांधीनगर, मोख, आनंदवाडी, रामगाव परिसरातील भूमिपुत्रांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आगामी आठवडाभरात कापसाला 12 हजार रुपये, तुरीला 10 हजार रुपये, सोयाबीनला 7 हजार रुपये न मिळाल्या तसेच पिकविमा न मिळाल्यास मिळाला नाही जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा वसंत प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल चव्हाण, मांगीलाल चव्हाण, पवन आडे, माधव राठोड आदींनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पिकविम्यासाठी हिंसक आंदोलन केले. बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Farmer's Protest in Yavatmal.
Yavatmal News : संजय राऊत आणखी अडचणीत; उमरखेडमध्ये गंभीर गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com