शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिक्षक भारतीने नाना पटोलेंना करून दिली ‘ती’ आठवण !

‘तुम्ही आमच्या पाठीशी रहा, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या सोबत राहू’, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले होते.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने कॉंग्रेसला मदत केली होती. त्यामुळे आता कॉंग्रेसने शिक्षक भारतीला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे.

नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी ‘तुम्ही आमच्या पाठीशी रहा, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या सोबत राहू’, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले होते. ते बोलल्याप्रमाणे आम्ही तेव्हा तसेच केले. तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, (Vikas Thakre) आमदार अभिजित वंजारी (Abhijeet Wanjari) आणि इतर नेते होते. आता आमची निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही सर्व कॉंग्रेस (Congress) नेत्यांची भेट घेत आहोत आणि त्यांना त्यांच्या शब्दाची आठवण करून देत आहोत. पण आता कॉंग्रेस नेते स्पष्ट बोलायला तयार नाही, असेही राजेंद्र झाडे ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

कॉंग्रेस आपला उमेदवार देणार नाहीये. आम्ही समर्थन देऊ, असे त्यांनी जाहीर केले. पण समर्थन नेमकं कुणाला देणार, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. सध्या सगळ्यात मजबूत उमेदवार आमचा म्हणजेच शिक्षक भारतीचा आहे. शिक्षक भारती, लोकभारती, आमदार कपील पाटील आम्ही सर्व महाविकास आघाडीमध्ये सोबत आहोत. त्यामुळे कॉंग्रेस आणि एकंदरीतच महाविकास आघाडीने आम्हाला समर्थन द्यावे, असे झाडे यांनी सांगितले. कॉंग्रेस हा देशातील मोठा पक्ष आहे. त्या पक्षाची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे यांचे नेते दिलेला शब्द पाळतील, असे वाटते, असेही ते म्हणाले.

Nana Patole
काँग्रेस वंचित आघाडीबाबत, नाना पटोले म्हणाले…

कॉंग्रेस नेत्यांनी जर का दिलेला शब्द नाही पाळला तर पुढच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ते पुन्हा आमच्या समोरासमोर येतीलच, तेव्हा बघून घेऊ आणि कॉंग्रेसने समर्थन आम्हाला दिले नाही, तर मतांची विभागणी होईल आणि मोठा फटका बसेल, असे सांगितले जात आहे. पण तसे होणार नाही. कारण बूथ, गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर आमची बांधणी झालेली आहे. आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे शिक्षक भारतीचा विजय या निवडणुकीत निश्‍चित आहे, असेही उमेदवार राजेंद्र झाडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com