Buldhana Politics : बायको 'लाॅयर' म्हणून तुपकरांचा लागला 'निकाल' !

Ravikant Tupkar : सत्य परेशान हो सकता है, पराजित नही !
Ravikant Tupkar and Police
Ravikant Tupkar and PoliceSarkarnama
Published on
Updated on

फहीम देशमुख

Buldhana Politics : मागील पंधरा दिवसांपासून बुलडाण्यात रविकांत तुपकर यांना जेल मिळणार की बेल ? लोकसभा निवडणूक जेलमधून लढणार की बाहेरून ? अशा विविध चर्चांना उधाण आले होते. न्यायालयाने सरकार पक्ष आणि तुपकरांची बाजू ऐकल्यानंतर निकाल राखीव ठेवण्यात आला होता. यानंतर सुनावणीसाठी तारीख पे तारीख मिळत होती. शेवटी आज बुधवारी (ता.21) बुलढाणा न्यायालयाने आपला निकाल घोषित करीत रविकांत तुपकरांना बेल (जामीन) मंजूर केला आहे. तुपकर यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

शेतकऱ्यांसाठी झालेल्या विविध आंदोलनात रविकांत तुपकर यांच्यावर दाखल 21 गुन्ह्यांत न्यायालयाने त्याना जमीन मंजूर केला होता. मात्र, जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा बुलडाणा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत जामीन रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी सलग पाच वेळा पुढे ढकलण्यात आली. आंदोलन करणे हा लोकशाहीमध्ये सर्वांना मिळालेला अधिकार आहे. कुठलेही क्रिमिनल गुन्हे रविकांत तुपकर यांच्यावर नाहीत. सोबतच मेधा पाटकर यांच्या आंदोलनाचे उदाहरण देत ॲड. शर्वरी तुपकर यांनी सरकारी वकिलांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढले. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण निकाल विरोधात गेला आणि पुन्हा तुरुंगात जाण्याचीही वेळ आली, तर मी तुरुंगातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी या आधीच व्यक्त केला होता. मात्र, आज न्यायालयाने दिलासा देत तुपकरांना जामीन मंजूर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravikant Tupkar and Police
NCP Ajit Pawar : राज्यात 'महाभूकंप' होणार! शरद पवार गटासह काँग्रेस हादरणार?

आगे आगे देखो मैदान मे होता है क्या !

सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हे मी नेहमीच सांगत होतो. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आणि सरकारने जे काही रिव्हिजन पिटिशन आमच्या विरोधात दाखल केले होते, न्यायालयाने नामंजूर केलं आणि मला मुक्त केले. हा खऱ्या अर्थाने सत्याचा विजय आहे. गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा विजय आहे. गोरगरिबांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. अनेक लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या, अनेक लोकांनी मी तुरुंगात जाऊ नये म्हणून माझ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. हा सगळ्या सर्वसामान्य नागरिकांचा जो काही चळवळीतला विश्वास आहे या विश्वासामुळेच आज खऱ्या अर्थाने मला तुरुंगात जायची वेळ आली नाही, असे म्हणत आगे आगे देखो मैदान मे होता है क्या, असा इशारा देत अतरवालीच्या सभेमध्ये सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तुपकरांच्या अर्धांगिनीने लढविला किल्ला !

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर हे आंदोलन रविकांत तुपकर यांनी पत्नी अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी पुढे नेले. शेतकर्‍यांचा हक्क मागणार्‍या अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांच्यासह आंदोलक शेतकर्‍यांवर मात्र पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिस ठाणे तसेच मेहकर पोलिस ठाण्यात ३० ते ४० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत. या गुन्ह्यांत लवकरच संबंधित शेतकरी तसेच अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या पतीला तुरुंगात टाकण्याचा डाव पोलिस प्रशासन करीत असल्याचे पाहून अर्धांगिनी अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी पोलिसांच्या षडयंत्राला तडा देण्यासाठी युक्तिवादाची बाजू स्वतःच्या हातात घेतली आणि मागील पंधरा दिवसांपासून न्यायालयात किल्ला लढवित होत्या. आज शर्वरी तुपकर यांना त्यामध्ये यश प्राप्त झाले असून, त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून रविकांत तुपकरांना न्यायालयाने जामीन दिला.

Edited By - Sachin Deshpande

R

Ravikant Tupkar and Police
Loksabha Election 2024 : महायुतीमध्ये बारामतीची जागा अजित पवार गटच लढवणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com