Gondia News : अतिक्रमण काढताना गोंदियात महिलेला धमकी देणे भोवले

Manora Gram Panchayat : सरपंच, उपसरपंचासह चार जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. मोकळ्या जागेतील साहित्य जेसीबीने दिले फेकून. प्रशासनाच्या निर्देशांनंतर केलेली कारवाई आली अंगलट.
Encrochment in Manora
Encrochment in ManoraSarkarnama
Published on
Updated on

Gondia News : वनविभागाच्या मोकळ्या जागेत ठेवलेले साहित्य जेसीबीद्वारे फेकत असताना हटकल्याने महिलेला शिवीगाळ करून मारहाण करणे व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनोरा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक यांच्यासह चार जणांविरोधात गोंदियाच्या तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरपंच ललिता नरेंद्र मारवाडे, रोजगार सेवक लिलाधर केशव तिडके, उपसरपंच रवी प्रकाश गणवीर, चंद्रकला मेश्राम यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील मनोरा येथील प्रेमलता विजय तिडके (वय 46) यांनी घराशेजारी असलेल्या वनविभागाच्या मोकळ्या जागेवर त्यांनी साहित्य ठेवले होते. तिडके गाईला चारा देण्यासाठी गेल्या असता ग्रामसेवक आणि सरपंच कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीद्वारे हे साहित्य फेकत असल्याचे प्रेमलता तिडके यांना दिसले. त्यावरून त्यांनी त्यांना हटकले. त्यावेळी रोजगार सेवक लिलाधर केशव तिडके (वय 48) यांनी शिविगाळ करत महिलेला ढकलले. उपसरपंच रवी प्रकाश गणवीर (वय 35) यांनीही महिलेला ढकलत शिवीगाळ केली. चंद्रकला मेश्राम (वय 30) यांनी अश्लील शब्दांत शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने ठेवलेल्या 1 लाख 32 हजार रुपये किमतीच्या साहित्याची यावेळी नासधूस झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Encrochment in Manora
Gondia News : केवळ निधी खर्च करण्यासाठी घेतले पशुपक्षी प्रदर्शन

या प्रकारानंतर प्रेमलता तिडके यांच्या तक्रारीवरून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलिसांनी सरपंच ललिता नरेंद्र मारवाडे, रोजगार सेवक लिलाधर केशव तिडके, उपसरपंच रवी प्रकाश गणवीर, चंद्रकला मेश्राम यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला. तिरोडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मनोरा येथे नवेगाव मनोरा ते सेलोटपार या मार्गावर झालेले अतिक्रमण तसेच गावातील गटाच्या जागेवर झालेले संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी गटविकास अधिकारी तिरोडा यांनी सरपंच व ग्रामसेवकांना सूचना दिली आहे. अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

विशेष म्हणजे गावातील अतिक्रमणाची तक्रार गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणेला केली गेली आहे. तक्रारीची दखल घेत प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी केली तसेच मनोरा ग्रामपंचायतीने केलेले अतिक्रमण ग्राह्य धरण्यात आले. अतिक्रमण काढण्यासाठी 10 ऑक्टोबर 2013 नुसार तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 52 व 53 नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी. केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयात सादर करावा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आपल्यावर गुन्हा नोंद झाल्यावर आता सरपंच, उपसरपंच यांनीअतिक्रमण विरोधी कारवाईला सरकारी आधार मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सरकारी यंत्रणा या पदाधिकाऱ्यांच्या पाठिशी उभी राहणार काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Encrochment in Manora
Bhandara-Gondia Lok Sabha Constituency : लोकसंग्रहाच्या बळावर डॉ. परिणय फुके यांची मैदानात उतरण्याची तयारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com