Mukhyamantri Ladki Bahin Yojana: 'लाडली बहीण'ची आर्थिक लूट करणं तलाठ्याला भोवलं; निलंबनानंतर आता गुन्हा दाखल

Akola FIR Filed Against Talathi Rajesh Shelke: मोठी उमरी भागातल्या तलाठी राजेश शेळके याने पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याचे 'साम'ने उघडकीस आणले होते.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana : विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सुरु केलेल्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची लुट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अमरावती, अकोला येथे तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे घेत असल्याचा गंभीर प्रकार आढळला आहे.

अकोल्यात महिलांकडून तलाठी राजेश शेळके हा उत्पन्नाचा दाखलासाठी लागणारा अहवाल देण्यासाठी पैसे घेतल्याचा वृत्त 'साम'ने दाखवले होते. त्यानंतर शेळके याचे निलंबन करण्यात आले. या कारवाईवर त्याच्यावर अकोल्यातल्या सिव्हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील तलाठी कार्यालयातील हा व्हिडिओ समोर होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित असून उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला गरजेचा असतो.

त्यासाठी मोठी उमरी भागातल्या तलाठी राजेश शेळके याने पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याचे 'साम'ने उघडकीस आणले होते. त्यानंतर तलाठी शेळके यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. या आधीही तलाठी शेळके यांच्यावर एसीबीनं कारवाई केली होती. आता पुन्हा अकोला एसीबीने शेळके यांच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाण्यातही काल जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा येथील तलाठ्याने कागदपत्र घेण्यासाठी आलेल्या महिला पुरुषांसोबत अरेरावी करून पैसे घेण्याचा आरोप करण्यात आला होता.

अनेक नागरिकांनी या तलाठ्याने पैसे घेतल्याचे आरोप माध्यमांसमोर केले . मात्र तरीही जिल्हा प्रशासन या तलाठ्याची चौकशी तर सोडाच पण कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे. मात्र तरीही फक्त कारणे दाखवा नोटीस तलाठ्याला बजावून जिल्हा प्रशासन हात झटकत आहेत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत दोन मोठे बदल, आता 'या' महिलांनाही मिळणार लाभ!

नागरिक स्वतःहून माध्यमांसमोर येऊन या तलाठ्याने पैसे घेतल्याच्या आरोप करत आहेत, मात्र तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी सुमोटो न घेता या तलाठ्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता जनसामान्यात संताप व्यक्त होत आहे मुख्यमंत्री याची दखल घेतील का ? अरेरावी करणाऱ्या व पैसे घेण्याचे आरोप असलेल्या तलाठ्यावर कारवाई करतील का? असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारीत आहेत.

अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात काल महिलांकडून पैसे घेत असल्याची बातमी होती.

या बातमीची दखल घेत अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर कारवाई करीत त्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ही कारवाई केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com