Mukhyamantri Ladki Bahin Yojana : बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत दोन मोठे बदल, आता 'या' महिलांनाही मिळणार लाभ!

Eknath Shinde Big Announcement : मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. यानंतर आता जिल्हा, तालुका, गाव पातळीवर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारच्या काळात मध्य प्रदेशमध्ये 'गेमचेंजर' ठरलेली 'लाडली बहना' ही योजना महाराष्ट्रात राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली 'लाडकी बहीण'ची घोषणा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

तेव्हापासून या घोषणेमधील त्रुटींचा पाऊस पाडत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला वारंवार घेरले आहे.तसेच या योजनेतील काही अटी व शर्थींमुळे महिलांना या योजनेत पात्र ठरण्यास अडचणी येत होत्या.पण आता लाडकी बहीण योजनेवरुन मोठी अपडेट समोर आली आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेत दोन मोठे बदल करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेबाबतचा (MukhyaMantri Ladki Yojana) अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे.यानंतर आता जिल्हा, तालुका, गाव पातळीवर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.

या योजनेचा अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सरकारकडून मिळणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती. पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. 

Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Prithviraj Chavan : माझी लाडकी बहीण योजनेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला झोडपले; नेमके काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता 'लाडकी बहीण' योजनेसाठीची वयोमर्यादा 5 वर्षांनी वाढवण्यात आली आहे. तसेच जमिनीची बाबतची अटही शिथिल करण्यात आली आहे.या योजनेसाठी आता 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना लाभ घेता येणार आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा 21 ते 60 अशी होती.

या योजनेतील दुसरा बदल हा जमिनीबाबतचा असून कुटुंबातील सदस्यांची एकत्रितपणे पाच एकरहून अधिकची शेतजमीन असलेल्या महिलांनाही आता या लाभ मिळणार आहे. या अगोदर संबंधित महिला पात्र ठरणार नव्हत्या.मात्र, आता सरकारने ही जमिनीच्या मालकीची अट काढून टाकली आहे.

Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
UP Hathras Satsang Stampede : उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना! सत्संगात चेंगराचेंगरी, 116 जणांचा करुण अंत; CM योगींनी घेतली गंभीर दखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com