Amravati Politics : दुखापतीनंतर खासदार बोंडेंनी घेतलं काँग्रेसला फैलावर

FIR Lodged : व्हिडिओच्या आधारे तिवसा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
Dr. Anil Bonde Injured in Stone Pelting at Amravati.
Dr. Anil Bonde Injured in Stone Pelting at Amravati.Sarkarnama
Published on
Updated on

प्रशिक मकेश्वर

Attack On MP Anil Bonde : तिवसा येथील बैलगाडा शर्यतील भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर झालेल्या दगडफेक प्रकरणी तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शंकरपटाच्या ठिकाणी असलेल्या व्हिडिओ कॅमेरा फुटेजची तपासणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे. लवकरच आरोपींपर्यंत पोहोचू, असं तिवसा पोलिसांनी स्पष्ट केलं.

तिवसा येथे भाजप नेते रविराज देशमुख व महाराष्ट्र ग्राम दर्पण यांच्या वतीनं अनेक वर्षांनंतर तीन दिवसांच्या राज्यस्तरीय किसान शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान काहींनी खासदार डॉ. बोंडे यांच्यावर दगडफेक केली. यात त्यांना दुखापत झाली. (FIR Lodged Against Person's Pelting Stone on BJP Member Of Parliament Anil Bonde In Tiosa Of Amravati District)

Dr. Anil Bonde Injured in Stone Pelting at Amravati.
Sambaji Bhide Statement ON Mahatma Gandhi : भिडेंच्या समर्थनार्थ भाजप खासदार अनिल बोंडे मैदानात ; यशोमती ठाकूर यांना अटक करा..

आर्वीचे आमदार दादाराव केचे, माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, नितीन गुढधे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला होता. दगडफेकीच्या प्रकारानंतर खासदार डॉ. बोंडे यांनी काँग्रेसला चांगलच फैलावर घेतले आहे. दगडं मारणारे असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. हे टवाळखोर काँग्रेसचे असावेत असं दिसत आहे. त्यांनाच अशा प्रकारचं कृत्य करण्याची सवय आहे. सामाजिक कार्यक्रमांमध्ये असा प्रकार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही डॉ. बोंडे यांनी दिला.

शंकरपटाच्या ठिकाणी झालेल्या या घटनेनंतर खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 324 प्रमाणे दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आयेाजनाच्या ठिकाणी कॅमेरा आणि ड्रोनही होते. त्यांचे व्हिडिओ फुटेज तपासण्यात येत आहे. त्यातून दगडफेक करणारे कोण आहेत, याची ओळख पटेलच. लवकरच आम्ही आरोपींपर्यंत पोहोचू, असं तिवसा पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांचं वर्चस्व आहे. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. बोंडे व अॅड. ठाकूर यांच्यात तुंबळ वाकयुद्ध सुरू आहे. अगदी डीएनए काढण्यापासून तर इंग्रजांचे चाकर म्हणण्यापर्यंत हे राजकीय युद्ध रंगलं. प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू आणि डॉ. बोंडे यांच्यातही मध्यंतरीच्या काळात चांगलीच बिनसली होती. रावण आणि कंसापर्यंत तुलना करण्यापर्यंत हा वाददेखील वाढला होता. अशात खासदार डॉ. बोंडे यांना दगड मारणारे नेमके काँग्रेस कार्यकर्ते आहेत की अन्य कुणी, हे शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढं आहे. तूर्तास खासदार डॉ. बोंडे यांचा रोष सध्या तरी काँग्रेसवरच आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Dr. Anil Bonde Injured in Stone Pelting at Amravati.
Amravati Yashomati Thakur : 'पंकजा मुंडेंसोबत न्याय व्हायलाच पाहिजे'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com