Gadchiroli : गणपूरवरून गंगापूरला जाणारा डोंगा नदीत उलटला; सात महिला बुडाल्या

Rescue Operation : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील घटना
Vainganga River Chandrapur.
Vainganga River Chandrapur.Sandip Raipure
Published on
Updated on

Vainganga River : गडचिरोली जिल्ह्याच्या गणपूर गावातील सात महिला डोंगा उलटल्याने वैनगंगा नदीच्या पात्रात बुडाला. यातील दोन महिलांचे मृतदेह हाती लागला असून अन्य बेपत्ता महिलांचा शोध सुरू आहे. मंगळवारी (ता. 23) ही घटना घडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथे कापूस वेचणी करण्यासाठी वैनगंगा नदीच्या पात्रातून दोन डोंग्याने या महिला निघाल्या होत्या. नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा अचानक उलटला. डोंग्यात बसलेल्या महिला नदीपात्रात बुडाल्या. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. घटना उघडकीस येण्यासाठी बराच वेळ लागला. तोवर दोन महिलांचा मृत्यू झाला होता.

Vainganga River Chandrapur.
Chandrapur : गाव तहानेने व्याकुळलेले, अशात महिला सरपंचांने केले असे काही की...

डोंगा उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने शोधमोहिम हाती घेतली. त्यानंतर दोन महिलेचा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आला. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला वैनगंगा नदी विभाजते. गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर नदीच्या त्या काठावर आहे. एका बाजूला चंद्रपुरातील पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक हे गाव आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणी करण्याकरिता गणपूर येथील 10 महिला डोंग्याने गंगापूर टोककडे निघाल्या होत्या. अशातच डोंग्याचा तोल बिघडला व तो उलटला. डोंगा उलटताच एकापाठोपाठ त्यातील सर्व महिला नदीच्या प्रवाहात बुडाल्या. पुष्पा मुक्तेश्वर झाडे (वय 42), जिजाबाई दादाजी राऊत ( वय 55) यांचा यात मृत्यू झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रेवंताबाई हरिश्चंद्र झाडे (वय 42), सुषमा राऊत (वय 25), माया राऊत (वय 45) ,सारणबाई कस्तुरे (वय 60), बुधाबाई राऊत व नावाडी सदाशिव मंढरे आदी अद्यापही बेपत्ता आहेत. नदीत बुडतानाच महिलांनी बचावाचा बराच प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीन शोध मोहिम हाती घेण्यात आली. चंद्रपूर व गडचिरोली येथील आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीन शोधाशोध सुरू केली. त्यात जिजाबाई आणि पुष्पा या दोघींचे मृतदेह हाती लागले. नावाडी सदाशिव मंडरे व सारूबाई कस्तुरे थोडक्यात बचावले.

बुडलेल्या इतरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस आधिकारी मयूर भुजबळ, चामोर्शीचे उपविभागीय महसूल अधिकारी उत्तम तोडसाम, पोभुर्ण्याचे तहसीलदार शिवाजी कदम, चामोर्शीचे प्रशांत घुरडे, ठाणेदार मनोज गदादे यांच्यासह प्रशासनाची पूर्ण टीम घटनास्थळी तैनात आहे. वैनगंगेच्या पात्रातून सापडलेले मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत. दोन डोंग्यातून ग्रामस्थ प्रवास करीत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण 13 लोक नदी पार करीत होते. पहिला डोंगा समोर निघाला. त्यामागे दुसरा डोंगा होता. दुसरा डोंगा उलटल्यानंतर समोरील नावाड्याने आपला डोंगा फिरवला. मात्र तो अनेकांचा बुडण्यापासून वाचवू शकला नाही. वैनगंगेच्या पात्रात घडलेल्या या अपघातातील बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Vainganga River Chandrapur.
Gadchiroli : अनखोडात विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली अन् एका युवकाने चक्क...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com