Chandrapur Forest Academy : वन अकादमीला मिळाले प्रतिष्ठेचे ‘थ्री स्टार’ मानांकन

Forest Department : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता स्थापनेसाठी पुढाकार
Sudhir Mungantiwar & Forest Academy.
Sudhir Mungantiwar & Forest Academy.Sarkarnama
Published on
Updated on

NABET Rating : भारतीय गुणवत्ता परिषदेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाद्वारे (NABET) चंद्रपूर येथे वन विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या चंद्रपूर वन अकादमीला उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून ‘थ्री स्टार’ मानांकन प्रदान केले आहे.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे वन व अर्थमंत्री असताना त्यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात ही वन अकादमी स्थापन झाली होती. योगायोग म्हणजे मुनगंटीवार हेच पुन्हा वनमंत्री असताना अकादमीला हा बहुमान मिळाला आहे. मूल्यमापनातून चंद्रपूर वन अकादमीने देशातील पहिल्या दहा संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.

Sudhir Mungantiwar & Forest Academy.
Chandrapur : वीज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट मोफत मिळण्यासाठी नेत्याचा एकाकी लढा

भारतीय गुणवत्ता परिषदेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळ ही स्वायत्त संस्था आहे. भारतातील राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांना राष्ट्रीय मानकांनुसार मान्यता प्रदान करते. ‘एनएबीईटी’ संस्थेच्या चमूने चंद्रपूर वन अकादमीची पाहणी करून विविध निर्देशांकांच्या आधारे अकादमीचे मूल्यांकन केले.

मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विकसित झालेल्या चंद्रपूर वन अकादमीत भारतीय वन सेवा (IFS), रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स आणि वन विभागाच्या इतर क्षेत्रीय आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वन व्यवस्थापन, वन्यजीव संरक्षण, जैवविविधता, पर्यावरणीय कायदे, समुदाय प्रतिबद्धता आणि प्रशासकीय बाबी यासह विविध विषयांवर सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधुनिक सुविधा आणि संसाधनांनी सुसज्ज असून येथे व्याख्यान कक्ष, प्रशिक्षण क्षेत्र, प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय आणि प्रशिक्षणार्थीसाठी निवास सुविधा वन अकादमीत उपलब्ध आहे. चंद्रपूर वन अकादमीला मिळालेली ही मान्यता 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 पर्यंत दोन वर्षांसाठी वैध राहणार आहे.

पुण्यातील ‘यशदा’च्याधर्तीवर चंद्रपुरात वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधनी अर्थात वन अकादमी उभारण्यात आली आहे. ही अकादमी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम आहे. चंद्रपूर-मूल मार्गावर वनराजीक महाविद्यालयाच्या जागेवर वन प्रबोधिनी 4 डिसेंबर 2014 मध्ये स्थापन झाली. पर्यावरण क्षेत्रात संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे व जनजागृतीचे उपक्रम हाती घेणे, यासोबतच वन खात्याची शिखर संस्था म्हणून ही अकादमी काम करत आहे. तांत्रिक तसेच सेवाअंतर्गत प्रशिक्षण येथे देण्यात येते. आयएएस व आयएफएस उमेदवारांना डेहराडून केंद्रात ज्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते, त्याच सुविधा चंद्रपुरात वन अकादमीत उपलब्ध आहेत. या अकादमीमुळे देशातील वन विभाग व वन्यजीवप्रेमींमध्ये चंद्रपूरचे नाव सातत्याने चर्चेत असते. सर्वाधिक वाघांचा जिल्हा म्हणूनही जगाच्या नकाशावर चंद्रपूरच्या नावाचा उल्लेख आहे.

Edited by : Atul Mehere

Sudhir Mungantiwar & Forest Academy.
Nagpur News : ललित पाटील प्रकरणानंतर सुनील केदारांबाबत आरोग्य विभागाचे सावध पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com