नागपूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक काल राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे (Nagpur) पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माजी पालकमंत्र्यांनी जास्तीत जास्त निधी उत्तर नागपूर म्हणजे त्यांच्याच मतदारसंघात नेला, अशी तक्रार आमदारांनी केली. त्यावर सर्व प्रस्तावांची फेरतपासणी करूनच मंजुरी दिली जाईल, असे फडणविसांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेत झालेल्या आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकीत माजी पालकमंत्री (Guardian Minister) नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांच्यावर जवळपास सर्वांचा रोख होता. त्यांनी आपल्या मतदार संघातच कामे नेल्याचा पाढा भाजप आमदारांनी वाचला. त्यामुळे मागील बैठकीचे इतिवृत्तही कायम झाले नसून २०२२-२३ या वर्षातील कामांचीही फेर तपासणी होणार असल्याने विकास कामांना अप्रत्यक्षरीत्या स्थगितीच राहणार असल्याचे दिसते. येत्या काळात माजी पालकमंत्री राऊत यांना मोठा धक्का बसणार असल्याचे दिसून येते.
देशपांडे सभागृहात झालेल्या डीपीसीच्या बैठकीत आमदार आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, कृष्णा खोपडे, समीर मेघे, प्रवीण दटके, मोहन मते, राजू पारवे, अभिजित वंजारी, सुनील केदार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, सीईओ योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते. बैठकीत नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त कायम ठेवण्याचा विषयासह वर्ष २०२२-२३ साठी मंजूर निधी व खर्चाचा लेखाजोखा सादर केला.
राऊत यांनी दलितेत्तर लेखाशीर्ष अंतर्गत मिळणाऱ्या सर्वाधिक निधीचे आपल्याच मतदारसंघात नियोजन केले. खनिज प्रतिष्ठानचा निधीही त्यांनीच घेतला. राऊत यांच्या नावाचा उल्लेख टाळत एकाच मतदार संघात खनिज प्रतिष्ठानचा ३९ कोटींचा निधी मंजूर झाला असून कोटींच्या निविदाही काढण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदारांना न सांगतात निधी त्यांनी घेतल्याच्या तक्रारी कृष्णा खोपडे, आशिष जयस्वाल, समीर मेघेंसह इतर आमदारांनी केल्या. मागील कामांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
निधीबाबत आमदारांनी दिलेल्या पत्रावरही उत्तर मिळत नसल्याचा मुद्दा समीर मेघे यांनी उपस्थित केला. यावर्षी मंजूर निधीपैकी ६४ कोटींची कामे एकाच मतदार संघात असून एकच प्रस्ताव १९ कोटींचा असल्याचा मुद्दा आमदार सुनील केदार यांनी उपस्थित केला. हे काम राऊत यांच्या मतदार संघातील असल्याचे सांगण्यात येते. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव बघूनच मंजुरी देणार असल्याचे बैठकीत सांगितले. इतिवृत्ताचा विषय बैठकीत होता, त्याला मंजुरी मिळते, असे सांगत पत्रकार परिषदेत जास्त बोलण्याचे फडणवीस यांनी टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.