Subodh Savji News : ...तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा मुडदा पाडेल; सुबोध सावजींच्या इशाऱ्यानं खळबळ

Election Commission of India : देशातील सध्याचे सरकार ईव्हीएम मशीनघोटाळा करून महायुतीचे सरकार आणण्याच्या तयारी आहे. तशी मतदारांना शंका आहे. महाराष्ट्रातील मतदारांच्यावतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुबोध सावजी यांनी दिला.
Subodh Savji
Subodh Savji sarkarnama

Buldhana News : "मतदारांच्या अधिकारांचा उघड-उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल, तर मी मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही", असा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना दिला आहे. सुबोध सावजी यांनी दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner Delhi) यांना या इशाराचे पत्र पाठवले असून, हे पत्र समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.

राज्य लोकसभेच्या (Lok Sabha Elections) निवडणुका संपल्या आहेत. देशातील सहाव्या आणि सातव्या टप्प्यात निवडणुकाचा धुरळा उडत आहे. यानंतर चार जूनला मतमोजणी होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीविरुद्ध भाजप (BJP) महायुती, असा सामना रंगला होता. पहिल्या दोन टप्प्यापेक्षा तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात राज्यात झालेल्या मतदानावेळी आघाडी आणि महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर आरोप करताना खालची पातळी गाठली. त्यामुळे निवडणूक रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. आता दोन्ही बाजूने आम्ही एवढ्या जागा जिंकणार, असा अंदाज नेते व्यक्त करत आहेत.

Subodh Savji
NDDC Bank : सुनील केदारांची नागपूर खंडपीठाकडे धाव, शिक्षेच्या स्थगितीची मागणी!

बुलढाणा येथील माजी मंत्री सुबोध सावजी (Subodh Savji) यांनी दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र पाठवून दिलेला इशारा चर्चेत आला आहे. तसेच सुबोध सावजी यांची पत्र देखील समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. सुबोध सावजी यांनी या पत्रात म्हटले आहे, "राज्यात 48 पैकी 35 ते 40 जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा दावा सुबोध सावजी यांनी केला. मात्र देशातील सध्याचे सरकार ईव्हीएम मशीन (EVM machine) घोटाळा करून महायुतीचे सरकार आणण्याच्या तयारी करत असल्याची शंका मतदारांमध्ये आहे. महाराष्ट्रातील मतदारांच्यावतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्या शिवाय राहणार नाही". Subodh Savjis warning letter to the Chief Election Commissioner

सावजी म्हणतात, 'अजरामर होईल...'

सुबोध सावजी यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, "माझे वय सध्या 80 आहे. आता दहा किंवा २० वर्ष जगायचे आहे. माझ्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या (Voter) लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड-उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल तर, मी या मतदारांच्या हक्कांच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल. खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेल, अशी चेतावणी देत आहे".

Subodh Savji
BJP MLA Krishna Khopde : आधी भावनिक केलं नंतर गंडवलं; भाजप आमदार खोपडेंबाबत नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com