Nagpur News, 05 Nov : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिंगणा विधानसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय आणि तेवढ्याच धक्कादायक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार यांच्यावरच उमेदवारी मागे घेण्यास दबाव टाकण्यात आला होता.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन काँग्रेसच्या नेत्यांचे मनसुभे उधळून लावले. मात्र आपलेच सहकारी आणि मानस बंधूंच्या दबाव तंत्र आणि राजकीय अपक्षेने माजी मंत्री आणि उमेदवार रमेश बंग यांना चांगलाच धक्का बसला आहे.
हिंगणा विधानसभा मतदारसंघातून (Hingana Assembly Constituency) आघाडीने रमेश बंग यांचा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी अर्ज सुध्दा दाखल केला होता. मात्र ही जागा काँग्रेसला (Congress) हवी होती. माजी मंत्री सुनील केदार यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यांनी उमेदवारही ठरवले होते. ठरल्यानुसार जिल्हा परिषदेच्या सभापती उज्वला बोधारे आणि जिल्हा परिषद सदस्य वृंदा नागपुरे यांनी अर्ज दाखल सुध्दा केले होते.
केदार यांनी भाजपचे (BJP) आमदार समीर मेघे यांना यापूर्वीच चॅलेंज केले होते. मात्र जागा राष्ट्रवादी आणि बंग यांच्यासाठी सोडण्यात आल्याने ते नाराज होते. कुठल्याही परिस्थितीत ही जागा त्यांना आपल्या समर्थकांना द्यायची होती. यासाठी काल रात्रीपासूनच केदारानी फील्डिंग लावली होती. बंग यांच्या घरी माणसे पाठवली.
त्यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे बंग रविवारी घराबाहेर पडले नाहीत. केदार यांचा माघारीसाठी दबाव असल्याची चर्चा मतदारसंघात होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंग यांनी हिम्मत देत घराला वेढा दिला. शेवटी ही बाब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर गेली. त्यांनी आपापसात ठरवा असा निरोप दिला. त्यामुळे काँग्रेसचे बळ आणखीच वाढले.
केदार यांनी अनिल देशमुखांना बोलावले. बंग यांची समजूत काढा अशी विनंती केले. मात्र देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भावना जयंत पाटील यांना कळवली. इथेच गेम पालटला. बंग निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आणि काँग्रेस बंडखोर बोंधारे आणि नागपुरे यांनी माघार घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.