Nagpur News: माजी आमदार आशिष देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांचे पक्षातून निलंबन केले होते. आशिष देशमुख हे येत्या रविवारी (दि.18 जून) नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आशिष देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करत होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाच्या विरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांचे पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन केले होते.
आशिष देशमुख यांचे काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर देशमुख हे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
दरम्यान, माजी आमदार आशिष देशमुख यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिष देशमुख यांच्या घरवापसीने भाजपची नागपूरमध्ये ताकद वाढणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.